आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम, गुणेश्वरचा विजय; भारताची अाघाडी, उझबेकिस्तानविरुद्ध 2-0 ने अाघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- अनुभवी टेनिसपटू रामकुमार रामनाथन व प्रजनेश गुणेश्वरच्या  शानदार विजयाच्या बळावर यजमान भारतीय संघाला डेव्हिस चषकातील सामन्यात २-० ने अाघाडी मिळवून दिली. रामकुमारने शुक्रवारी पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात उझबेकिस्तानच्या तैमूर इसमाइलाेवचा पराभव केला. त्याने ६-२, ५-७, ६-२, ७-५ ने विजय संपादन केला. या विजयामुळे यजमानांना लढतीत अाघाडी मिळाली. अाता हीच लय कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
 
गुणेश्वरचा विजय 
भारताच्या युवा प्रजनेश गुणेश्वरने डेव्हिस चषकाच्या अापल्या पदार्पणातील सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत साजेरचा पराभव केला. त्याने ७-५, ३-६, ६-३, ६-४ अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. या विजयामुळे त्याने भारताच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. या विजयाने त्याचा अात्मविश्वास द्विगुणित झाला.
 
सानिया मिर्झा बाहेर 
चार्ल्सटन - दुसऱ्या मानांकित सानिया मिर्झा अाणि हलकाेवाला व्हाेल्व्हाे कार अाेपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. बिगरमानांकित अार. अटावाे अाणि अाेस्टापेंकाेने अंतिम अाठमध्ये सानिया-हलकाेवाचा पराभव केला. त्यांनी ६-२, ६-४ ने  विजय संपादन करून महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...