आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षांनंतर पहिल्यांदा नंबर वन फ्रेंच अाेपनच्या पहिल्या फेरीतच पराभूत; एकतारीनाचा सनसनाटी विज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - टेनिसमध्ये सत्रातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच अाेपनच्या पहिल्याच दिवशी अातापर्यंतच्या सर्वात माेठ्या सनसनाटी विजयाची नाेंद झाली. जागतिक क्रमवारीत ४० व्या स्थानावर असलेल्या एकतारिना मकाराेवाने रविवारी महिला एकेरीच्या सलामी सामन्यात नंबर वन एंजेलिक कर्बरचा पराभव केला. तिने ६-२, ६-२ अशा फरकाने सरळ दाेन सेटमध्ये एकतर्फी विजय संपादन केला.  अाेपन एरामध्ये (१९६८) पहिल्यांदा महिला एकेरीमध्ये नंबर वन खेळाडूला फ्रेंच अाेपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेमध्ये अव्वल मानांकित खेळाडूच्या सर्वात लवकर स्पर्धेबाहेर हाेण्याचा हा विक्रम जस्टिन हेनिन अाणि सेरेनाच्या नावे हाेता. हेनिनला २००४ अाणि सेरेनाला २०१४ मध्ये अव्वल मानांकित असताना फ्रेंच अाेपनच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला हाेता.  
पेत्रा क्विताेवाची विजयी सलामी : चेक गणराज्यची पेत्रा क्विताेवा ही यंदा फ्रेंच अाेपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारी पहिली खेळाडू ठरली. चाकूहल्ल्यातून सावरलेल्या जखमी पेत्राने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ज्युलियाचा पराभव केला. तिने ६-३, ६-२ ने विजय मिळवला.
 
    पुरुष एकेरी
-   सहाव्या मानांकित डाेमनिक थिएमने अाॅस्ट्रेलियाच्या बर्नाड टाॅमिकवर ६-४, ६-०, ६-२ ने मात केली.
-    अर्जेंटिनाच्या हाराेसियाे जेबालाेसने फ्रान्सच्या अाद्रियन मनारियाेवर ७-५, ६-३, ६-४ ने मात केली.  
-    स्पेनच्या गुइलर्माे गार्सियाे लाेपेजने  लक्झमबर्गच्या मुलरला ७-६, ६-७, ६-२, ६-२ ने पराभूत केले.
 
    महिला एकेरी
-    अाठव्या मानांकित कुज्नेत्साेवाने अमेरिकेच्या क्रिस्टिनाचा ७-६, ६-४ ने पराभव केला.
- रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन माेनिका पुइंगने इटलीच्या राॅबर्टा व्हिन्सवर ६-३, ३-६, ६-२ ने मात केली.   
-   लाटाव्हियाच्या जेलेना अाेस्तापेंकाेने अमेरिकेच्या लुसिया चिरिकाेला ४-६, ६-३, ६-२ ने धूळ चारली.
 
पुढील स्लाइडवर वाचा, चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट करतात निकालाचे महत्त्व...
 
बातम्या आणखी आहेत...