आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा धुव्वा; भारतीय संघ विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाेहा- गाैतम डागरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी अाशिया रग्बी सेव्हन ट्राॅफीमध्ये शानदार विजय संपादन केला. भारताच्या पुरुष संघाने सामन्यात कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने १४-१२ अशा फरकाने सामन्यात राेमहर्षक विजय मिळवला. भारताच्या खेळाडूंनी अापला दबदबा कायम ठेवताना सामना जिंकला.  दाेहा येथे अायाेजित करण्यात अालेल्या अाशिया रग्बी स्पर्धेमध्ये एकूण ११ देशांचे संघ सहभागी झाले. यामध्ये भारतासह पाकिस्तान, जाॅर्डन, फिलिपाइन्स, नेपाळ संयुक्त अरब अमिरात, थायलंड, इराण, बांगलादेश, सिंगापूर अाणि यजमान कतारचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...