आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर सानिया-मांजरेकर वाकयुद्ध, मांजरेकराच्या ट्वीटने भडकली सानिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारताची दिग्गज टेनिस स्टार सानिया मिर्झा अाणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यात िट्वटरवर वाक््युद्ध रंगले. सानियाच्या िट्वटवर मांजरेकरने उत्तर दिल्यानंतर दोघांत चांगलाच वाद रंगला. सुरुवातीला सानियाने िट्वट केले की, “जगात नंबर वन खेळाडू राहण्याचा ८० आठवड्यांचा प्रवास मी आज पूर्ण केला. हा प्रवास शानदार ठरला.
यामुळे मला यापुढेसुद्धा कठोर मेहनत घेण्याची प्रेरणा मिळत राहील.’ माजी क्रिकेटपटू आणि सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक संजय मांजरेकरने सानियाच्या िट्वटला उत्तर दिले. सानियाने आपल्या िट्वटमध्ये ‘दुहेरीत’ नंबर वन असा उल्लेख केला नाही, असे मांजरेकरने म्हटले.
मांजरेकरने िट्वट केले की, “तुमच्या म्हणण्याचा अर्थ दुहेरीत नंबर वन खेळाडू असाच ना...अभिनंदन.’ सानियाला मांजरेकरचे हे िट्वट चांगलेच बोचले आणि तिने मांजरेकरला कडक उत्तर दिले. प्रत्युत्तरात आणखी एक िट्वट करून सानिया म्हणाली,”मी आता एकेरीत खेळत नाही, हे सर्वांना माहिती आहे. मी दुहेरीबाबत बोलत आहे हा तर “काॅमनसेन्स’ आहे. असो. माझीच चूक आहे. काॅमनसेन्स इतकासुद्धा काॅमन नाही.’ सानियाच्या या उत्तराने प्रकरण चिघळले. वाद आणखी वाढला. मांजरेकरच्या हे बहुधा लक्षातही आले. मैदानावर बचावत्मक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मांजरेकरने याउलट भूमिका घेताना आणखी एक िट्वट करून सानियाला परत उत्तर दिले. मांजरेकरने म्हटले, “असो. तुम्ही एक महत्त्वपूर्ण (दुहेरी) माहिती देण्यास विसरल्या. ही माहिती माझ्यासारख्या “कॉमनसेन्स’ नसलेल्या लोकांसाठी महत्त्वाची आहे.’ प्रकरण येथेच थांबले नाही. सानियाने पुन्हा मांजरेकरला उत्तर देताना एका बातमीची लिंक आणि क्रमवारीची माहिती पोस्ट केली. मांजरेकरने याचे क्रिकेटच्या भाषेत उत्तर देऊन प्रकरण संपवले. मांजरेकरने अखेरच्या िट्वटमध्ये म्हटले की, “हो...आर्टिकलमध्ये नंबर वन दुहेरीची खेळाडू असा उल्लेख आहे. मलासुद्धा हेच म्हणायचे आहे. असो. मी ऑफस्टंपबाहेर जाणारे चेंडू सोडून देत असतो.’
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सानिया आणि संजय मांजरेकर यांच्यात कसे रंगलेय टि्वटवर वाक्ययुद्ध...
बातम्या आणखी आहेत...