आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक डायरी : रितुराणीला अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी रेड कार्ड, संघातून वगळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अापल्या नेतृत्वात तब्बल ३६ वर्षांनंतर भारतीय महिला टीमला अाॅलिम्पिक प्रवेश मिळवून देणाऱ्या कर्णधार रितुराणीला रेड कार्ड मिळाले अाहे. तिला रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेच्या भारतीय हाॅकी टीममधून डच्चू देण्यात अाला. सुमार कामगिरीमुळे तिला संघात स्थान देण्यात अाले नसल्याचे हाॅकी इंडियाने स्पष्ट केले. येत्या ३ दिवसांमध्ये अाॅलिम्पिक स्पर्धेसाठीच्या १६ सदस्यीय भारतीय संघाची घाेषणा करण्यात येईल. रितुराणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हाॅकी संघाने रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले. अाता राणी रामपालच्या नेतृत्वात भारताचा महिला हाॅकी संघ रिअाेत खेळण्याची शक्यता अाहे. याची लवकरच घाेषणा करण्यात येईल. अाता याकडे सर्वांची लक्ष लागून अाहे.
पुढे वाचा, जखमी बोल्टचा जमैका संघात समावेश...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...