आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची भारत-पाक मालिका रद्द होण्याची शक्यता, तणावाच्या वातावरणाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत अाणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त संबंधाचा परिणाम या दाेन्ही देशांतील महिला संघांच्या मालिकेवर होण्याची शक्यता अाहे. या दाेन्ही देशांतील महिला संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका प्रस्तावित हाेती. याचे अायाेजन याच महिन्याच्या शेवटी करण्यात येईल. यासाठी पीसीबीने यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे संयुक्त अरब अमिरात येथे मालिका अायाेजनास पीसीबी उत्सुक अाहे. मात्र, अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिका अायाेजनाला काेणत्याही प्रकारचा दुजाेरा दिला नाही. ही मालिका रद्द झाल्यास गुणांची विभागणी करण्याचा निर्णय चॅम्पियनशिपची तांत्रिक समिती घेईल.

या मालिकेतील सहा गुण पाकिस्तान टीमला मिळाले तरीही या टीमला वा भारताला वर्ल्डकपमधील अापला थेट प्रवेश निश्चित करण्याची संधी नाही. भारतीय महिला टीम अायसीसीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर अाहे.

भारताला गमवावे लागतील गुण
पाकिस्तानच्या वतीने अायाेजित मालिकेत खेळण्यास नकार दिल्याचा माेठा फटका भारताला बसू शकताे. यामुळे भारताला गुणांना मुकावे लागेल, अशी ताकीद अायसीसीने दिली. महिला चॅम्पियनशिपनंतर अव्वल चार संघांना इंग्लंडमध्ये पुढच्या वर्षी हाेणाऱ्या विश्वचषकात प्रवेश दिला जाईल.

पाकचा सहभाग
भारतीय पुरुष संघाने पाकविरुद्ध २०१२पासून एकही मालिका खेळली नाही. मात्र, पाकने भारतात झालेल्या आयसीसीच्या स्पर्धांत सहभाग घेतला होता.
बातम्या आणखी आहेत...