आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : सेरेना-कर्बर झुंजणार; दुहेरीत सानिया पराभूत, व्हीनस विल्यम्सचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स अापल्या विक्रमी २२ व्या ग्रॅँडस्लॅम किताबापासून अाता अवघ्या एका पावलावर अाहे. तिने गुरुवारी सत्रातील तिसऱ्या ग्रॅँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. अाता तिला एकेरीच्या किताबासाठी अंतिम फेरीत चाैथ्या मानांकित एंजेलीक कर्बरशी झुंुजावे लागणार अाहे.

दुसरीकडे जगातील नंबर वन सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस व अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचे पुरुष दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अँडी मरेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत इंग्लंडच्या मरेला उपांत्यपूर्व सामन्यात शर्थीची झंुज द्यावी लागली. त्याने ३ तास ५४ मिनिटांच्या रंगतदार लढतीमध्ये १२ व्या मानांकित ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाचा पराभव केला. त्याने ७-६, ६-१, ३-६, ४-६, ६-१ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याला एकेरीच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला.

टाॅमस बर्डिचला अागेकूच कायम ठेवताना उपांत्य फेरी गाठता अाली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सच्या पाेऊल्लीईवर मात केली. त्याने ७-६, ६-३, ६-२ ने विजय मिळवला.
कर्बरची व्हीनसवर मात
चाैथ्या मानांकित एंजेलिक कर्बरने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जगातील माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सचा पराभव केला. तिने ६-४, ६-४ ने सामना जिंकला. यासह तिने ७२ मिनिटांत अंतिम फेरीत गाठली.

ब्रायन बंधूंचा पराभव
नंबर वन माइक व बाॅब या ब्रायन बंधूंचा पुरुष दुहेरीत पराभव झाला. रशियाच्या क्लासेन व अमेरिकेच्या रार्नने दुसऱ्या मानांकित ब्रायन बंधूंवर मात केली. क्लासेन अाणि रार्नने ७-६, ६-१, ७-६ ने सनसनाटी विजयाची नाेंद केली.

सेरेना ४८ मिनिटांत अंतिम फेरीत
अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने अवघ्या ४८ मिनिटांत महिला एकेरीच्या फायनलचे तिकीट मिळवले. तिने रशियाच्या बिगरमानांकित एलेना वेस्निनाला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-२, ६-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला.

सानिया-मार्टिनाचे पॅकअप
सानिया मिर्झा-मार्टिनाचा महिला दुहेरीत पराभव झाला. या जाेडीला महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. पाचव्या मानांकित तिमेया बाॅबाेस अाणि याराेस्लावा श्वेदाेवाने अंतिम अाठमध्ये सेरेना-मार्टिनावर ६-२, ६-४ ने सनसनाटी विजयाची नाेंद केली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...