आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस: स्टाेसूरची विजयी सलामी, व्हीनस विल्यम्सची दुसऱ्या फेरीत धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- दाेनवेळची अमेरिकन अाेपन चॅम्पियन समंथा स्टाेसूर अाणि जगातील माजी नंबर वन व्हीनस विल्यम्सने साेमवारी यंदाच्या सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यासह स्टाेसूरने या स्पर्धेतील किताबाच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात पाेलंडच्या मेगडा लिनेट्टेचा पराभव केला. तिने ७-५, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. यासाठी तिला शर्थीची झुंज द्यावी लागली. तिला बिगरमानांकित लिनेट्टेने पहिल्या सेटवर चांगलेच झंुजवले. मात्र, अनुभवाच्या बळावर अाॅस्ट्रेलियाच्या समंथा स्टाेसूरने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. तिने टायब्रेकरपर्यंत रंगलेला हा सेट ७-५ ने जिंकून लढतीत अाघाडी मिळवली. त्यानंतर तिने दुसरा सेट सहज जिंकून सामना अापल्या नावे केला.

दुसरीकडे २९ व्या मानांकित कसात्कीनाने सलामीचा सामना जिंकला. तिने अमेरिकेच्या डुवलचा पराभव केला. तिने ६-०, ७-५ ने शानदार विजय संपादन केला. तसेच अाठव्या मानांकित व्हीनसने सलामीला क्राेएशिच्या वेकिटवर ७-६, ६-४ अशा फरकाने मात केली. पुरुष एकेरीत जपानच्या केई निशिकाेरी, कॅनडाचा मिलाेस राअाेनिकने दुसऱ्या फेरीत धडक मारली.

याेकाेविकचा राेमहर्षक विजय
अव्वलमानांकित नाेवाक याेकाेविकने पुुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने सलामी सामन्यात इंग्लंडच्या जे. वार्डचा पराभव केला. त्याने ६-०, ७-६, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला चाैथ्या किताबाच्या अापल्या माेहिमेला चांगली सुरुवात करता अाली. त्याने अातापर्यंत तीन वेळा विम्बल्डनची फायनल जिंकली अाहे.
बातम्या आणखी आहेत...