आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस : मुगुरुझाकडून कर्बरचे पॅकअप; वाेज्नियाकीचे अाव्हान संपुष्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - गत २०१६ ची फ्रेंच अाेपन चॅम्पियन गार्बिने मुगुरुझाने सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेत साेमवारी सनसनाटी विजयाची नाेंद केली. तिने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टरमध्ये किताबाच्या प्रबळ दावेदार अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरचा पराभव केला. अनपेक्षित पराभवामुळे किताबाच्या प्रबळ दावेदार कर्बर व वाेज्नियाकीला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. अमेरिकेच्या वांदेवेघेने महिला एकेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित कॅराेलीना वाेज्नियाकीवर ७-६, ६-४ ने मात केली. दुसऱ्या मानांकित सिमाेना हालेपने व्हिक्टाेरिया अझारेंकाचा ७-६, ६-२ ने पराभव केला. दुसरीकडे मरेने २ तास २१ मिनिटात पियरेवर ७-६, ६-४, ६-४ ने मात केेली.  अग्निजस्का रदावांस्काचेही अाव्हान संपुष्टात अाले.  विजयासह सातव्या मानांकित कुज्नेत्साेवा व दहाव्या मानांकित व्हीनसने उपांत्यपूर्व फेरी गाठली.  
 
माजी नंबर वन व्हीनसने महिला एकेरीच्या अंतिम १६ च्या सामन्यात एकतर्फी विजय संपादन केला. तिने लढतीत दहाव्या मानांकित काेन्जुहला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६४ मिनिटांमध्ये ६-३, ६-२ ने विजय मिळवला.   
 
स्वेतलाना  बाहेर पडली : चाैथ्या मानांकित एलेना स्वेतलानाला   अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. अाेस्तापेंकाेने स्वेतलानाचा ६-३, ७-६ ने पराभव केला.
 
मुगुरुझाची मॅरेथाॅन लढतीत कर्बरवर मात 
१४ व्या मानांकित गार्बिने मुगुरुझाने महिला एकेरीच्या अंतिम १६ मध्ये रंगलेल्या मॅरेथाॅन लढतीत शानदार विजय संपादन केला. तिने लढतीत अव्वल मानांकित कर्बरला पराभूत केले. तिने २ तास २० मिनिटांच्या मॅरेथाॅन लढतीमध्ये बाजी मारली. तिने ४-६, ६-४, ६-४ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. 
 
पुढील स्लाइडवर, कुज्नेत्साेवाकडून रदावांस्काचा पराभव 
बातम्या आणखी आहेत...