आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : कर्बर,सेरेना उपांत्य फेरीत; हालेपचे अाव्हान संपुष्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जर्मनीच्या एंजेलिक कर्बर अाणि अव्वल मानांकित सेरेनाने मंगळवारी सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे महिला गटातील पाचव्या मानांकित सिमाेना हालेपचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच दुसऱ्या मानांकित अँडी मरेसह फ्रान्सच्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. जगातील नंबर वन सेरेनाने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये पावलुचेंकाेवाला ६-४, ६-४ ने हरवले.

इंग्लंडच्या अँडी मरेने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. त्याने अाॅस्ट्रेलियाच्या १५ व्या मानांकित निक कायग्राेसचा पराभव केला. त्याने ७-५, ६-१, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याला एकेरीच्या अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित करता अाला.
सानिया-डाेंडिग पराभूत : मिश्र दुहेरीत अव्वल मानांकित सानिया मिर्झा व डाेंडिगचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. या जाेडीला इंग्लंडच्या स्कुस्पकी व स्मिथने ६-४, ६-३, ७-५ अशा फरकाने नमवले.
व्हिनस अंतिम चारमध्ये
माजी नंबर वन व अाठव्या मानांंकित व्हिनसने महिला एकेरीच्या अंतिम ८ मध्ये कझाकिस्तानच्या श्वेदाेवावर मात केली. तिने एकतर्फी विजय साकारला. अमेरिकेच्या व्हिनसने ७-६, ६-२ ने विजयाची नाेंद केली. यासह तिने उपांत्य फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला.
राअाेनिकची १८२ मिनिट झुंज
सहाव्या मानांकित मिलाेस राअाेनिकने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये तब्बल १८२ मिनिटे शर्थीची झुंज देत विजयश्री खेचून अाणली. त्याने लढतीत ११ व्या मानांकित डेव्हिड गाेफिनला पराभूत केले. कॅनडाच्या राअाेनिकने ४-६, ३-६, ६-४,६ -४, ६-४ अशा पाच सेटमध्ये राेमांचक विजय मिळवला. त्यामुळे त्याला अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित करता अाला.
हालेपचा पराभव
जर्मनीच्या एंजेलिक कर्बरने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाचव्या मानांकित सिमाेना हालेपचा पराभव केला. तिने ७-५, ७-६ ने विजय मिळवला. यासह चाैथ्या मानांकित केर्बरने ९० मिनिटांत सिमाेनाला बाहेरचा रस्ता दाखवला.
पेस-मार्टिना विजयी
फ्रेंच अाेपन चॅम्पियन िलएंडर पेस अाणि मार्टिना हिंगीसने मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. या १६ व्या मानांकित जाेडीने दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडच्या सिटक अाणि जर्मनीच्या सिगेरमुडवर मात केली. पेस-मार्टिनाने ६-४, ६-४ ने एकतर्फी विजय मिळवला. यासह या जाेडीला पुढच्या फेरीत प्रवेश करता अाला. त्यांनी दाेन्ही सेटवर अापला दबदबा कायम ठेवताना विजयाची नाेंद केली. त्यांनी एक तास १७ मिनिटांत विजयश्री खेचून अाणली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...