आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धा, रिया, वेणुगोपाल, ली पहिल्या फेरीत विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एंड्युरन्स् एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे आयोजित २५ हजार डॉलर महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत एकेरी गटात भारताच्या रिया भाटिया, ध्रुती वेणुगोपालसह तैपैईची पी ची ली हिने आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करत स्पर्धेत आघाडी घेतली.

दुसऱ्या मानांकित रिया भाटिया हिने आपली देश सहकारी वैष्णवी पेड्डी रेड्डीचा ७-६(२) ६-१ ने पराभव केला. दुसऱ्या लढतीत तैपैईच्या पी-ची ली हिने भारताच्या स्नेहा पदमताला ६-४, ६-० असा सहज नमवत पुढील फेरीत प्रवेश केला. राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती ध्रुती वेणुगोपाल हीने माजी राष्ट्रीय विजेती साई संहिता चामार्थीचा ३-६, ६-३,६-३ असा तीन सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत हरवले. दुहेरी गटात मिकी मियामुरा आणि अंकिता रैना या जोडीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी प्रार्थना ठोंबरे आणि नन्गना वानासुक(४) या जोडीवर ६-२, ५-० वर्चस्व राखले, अखेर प्रार्थना व नन्गना यांनी सामना सोडून दिला.

स्पर्धेचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि एन्ड्युरन्सचे चेअरमन नरेश चंद्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भरत ओझा, रणजित दास, रोहन जैन, सुंदर अय्यर, वर्षा जैन, शीतल अय्यर, अर्शद देसाई, गजेंद्र भोसले, शेषराव तुपे, प्रवीण गायसमुद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर निकाल
एकेरी : ध्रुती टाटाचार वेणुगोपाल वि.वि साई संहिती चामार्थी ३-६, ६-३,६-३, पी-ची ली वि.वि स्नेहा पदमता ६-४, ६-०, रिया भाटीया (२) वि.वि वैष्णवी पेड्डी रेड्डी ७-६(२) ६-१.
दुहेरी : मेलीस सेझर व एकातेरीना याशिना(१) वि.वि नताशा पल्हा व ध्रुती टाटाचार वेणुगोपाल ३-६, ६-३, १४-१२, चिंग- वेन सू व अयाका ओकुनो(३) वि.वि. साई संहिता चामार्थी (४) व प्रांजला येडलापल्ली (५) ६-१, ६-७(५) १०-५.