आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयटीएफ स्पर्धा, रिशिका सनकारा, प्रेरणा भांब्रीची विजयाने आगेकूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एन्ड्युरन्स एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटरतर्फे (ईएमएमटीसी) आयोजित २५ हजार डॉलर महिला आयटीएफ अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैना, रिशिका सनकारा, स्नेहादेवी रेड्डी, प्रांजला येडलापल्ली, प्रेरणा भांब्री या भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत रिशिका सनकाराने रश्मी तेलतुंबडेचा ६-१, ६-२ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली. स्पर्धेत पाचव्या मानांकित अंकिता रैनाने युवा खेळाडू अम्रिता मुखर्जी ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करून अपेक्षेप्रमाणे विजयी आगेकूच सुरू केली. प्रेरणा भांब्रीने संघर्षपूर्ण लढतीत तिसऱ्या मानांकित अयाका ओकुनोला ३-६, ६-३, ४-६ अशा फरकाने पराभूत केले. यासह तिने सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. यासाठी तिला तीन सेटपर्यंत चुरशीची खेळी करावी लागली. दुसरीकडे स्नेहादेवी एस. रेड्डीने नताशा पल्हाचा ६-२, ६-२ असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. थायलंडची माजी फेड कुपर नन्गना वान्नासुक हिला पात्रता फेरीत अग्रमानांकन देण्यात आले आहे.
प्रार्थनाचा पराभव
महिला दुहेरीची लढत सोडल्यानंतर एकेरीमध्ये भारताची अव्वल खेळाडू प्रार्थना ठोंबरे उत्कृष्ट कामगिरी करेल, असे वाटत होते. मात्र, एकेरीच्या पहिल्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या मानांकित तादेजा माजेरिक हिने प्रार्थना ठोंबरेला ६-१, ६-२ असे सरळ दोन सेटमध्ये हरवत दुसरी फेरी गाठली.