आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगमध्ये ब्रेन डॅमेज होण्याची भीती वाटते; जोशुआने व्यक्त केली मनातली भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एखाद्या बॉक्सरला कशाची भीती वाटते हे माहीत झाले तर आपल्याला निश्चित धक्का बसेल. मात्र, हे सत्य आहे. इंग्लंडचा स्टार बॉक्सर अँथोनी जोशुआसुद्धा घाबरतो. त्याची ही भीती बॉक्सिंगशीच संबंधित आहे हे विशेष. तो म्हणाला,"मला रिंगमध्ये मरणाची भीती वाटत नाही. मात्र, मी रिंगमध्ये मरणाचा, मृत्यूचा विचार करू लागलाे तर लक्ष्यापासून भरकटेल आणि पराभूत होईल याची मला भीती वाटते.

रिंगमध्ये बॉक्सिंग करताना माझा ब्रेन डॅमेज होऊ नये याचीसुद्धा मला भीती वाटते.' त्याने आपल्या भीतीबाबत माहिती दिली. तो म्हणाला, मला दोन गोष्टींची खास भीती वाटते. एक तर मी आतापर्यंत जे काही मिळवले आहे, कमावले आहे ते एके दिवशी गमावेल काय? असे झाले तर मी माझ्या मुलाचे संगोपन कसा करू शकेल? ही भीती माझ्या मनात बसली आहे. यामुळे मी माझ्या मुलासाठी अधिकाधिक पैसे कमवू इच्छितो. दुसरी भीती बॉक्सिंग करतानाची आहे. बॉक्सिंगचा परिणाम माझ्या डोक्यावर होण्याची भीती आहे. मी रिंगमध्ये प्रवेश करतो तेव्हा ही भीती कायम असते. यामुळे माझे लक्ष खेळावरून भटकू शकते. मी यापासून वाचण्याचे प्रयत्न करतो आहे, असेही त्याने सांगितले.

जोशुआला २५ जून रोजी अमेरिकेच्या डॉमिनिक ब्रिआजिएलेशी लढायचे आहे. या हेवीवेट सामन्यात तो पहिल्यांदा आपला किताब वाचवण्यासाठी लढेल. त्याने अमेरिकेच्या चार्ल्स मार्टिनला पराभूत करून हेवीवेट टायटल जिंकले होते. माजी ऑलिम्पिक चॅम्पियन जोशुआने या सामन्याची तयारी करीत असताना आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोबत त्याने लिहिले की, "वेलकम टू नॉकआऊट शाे जून २५.' या फोटोत तो साखळीने बांधलेला दिसतो आहे.

जोशुआने माजी महान बॉक्सर मोहंमद अली यांना श्रद्धांजली दिली. तो म्हणाला, "अली आमच्या खेळातील ऑल टाइम लिजेंड होते. त्यांनी या खेळाची परिभाषाच बदलली. मी बालपणापासून अली यांच्याने प्रभावित झालो आहे. रिंगच्या आत आणि बाहेर एका चॅम्पियनप्रमाणे कसे जगायचे हे त्यांनी शिकवले. मी त्यांच्यासारख्या महान व्यक्तीशी कधी भेटू शकलो नाही याचे दु:ख मला नेहमी असेल,' असेही त्याने म्हटले.