आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१० किमीची रेस पूर्ण करण्यास ७०० मीटरचे अंतर शिल्लक असताना चक्कर आली; भावाने सांभाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोजूमेल (मेक्सिको) - इंग्लंडचा अॅथलिट जॉनी ब्राऊनली वर्ल्ड ट्रायथलॉन सिरीजमध्ये रेस जिंकण्याकडे आगेकूच करत होता. रेस अवघे ७०० मी. शिल्लक राहिली होती. अचानक उष्माघातामुळे त्याला चक्कर आली आणि तो ट्रॅकवर पडला. त्याच्या मागे धावत असलेला त्याचा भाऊ अॅलेस्टेयरने त्याला सांभाळले आणि फिनिश लाइन ओलांडण्यास मदत केली. रेसमध्ये जॉनी दुसरा तर अॅलेस्टेयरने ितसरे स्थान मिळवले. मात्र, तीन खेळांची ट्रायथलॉन स्पेनच्या मारियो मोलाने ४८१९ गुणांसह जिंकली. जॉनीने ४८१५ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. रेसिंगच्या आधी झालेल्या सायकलिंग आणि जलतरणात अॅलेस्टेयर खास कामगिरी करू शकला नाही. यामुळे तो टॉप-५ मध्ये आला नाही. त्याने एकूण रँकिंगमध्ये दहावे स्थान मिळवले. अॅलेस्टेयरने रिओ ऑलिम्पिकमध्ये ट्रॉयथलॉनचे सुवर्णपदक जिंकले होते.
घडले असे की वर्ल्ड ट्रायथलॉन सिरीजच्या अखेेरच्या स्पर्धेत १० किमी रेसमध्ये जॉनी फिनिश लाइनच्या जवळ पोहोचला होता. तो ही रेस जिंकण्याच्या स्थितीत होता. यामुळे त्याने चाहत्यांकडे बघून विजयी थाटात हात दाखवण्यास सुरुवात केली. २०१२ चा वर्ल्ड ट्रायथलॉन चॅम्पियन जॉनी दुसऱ्यांदा किताब जिंकणार इतक्यात त्याला उष्माघातामुळे चक्कर येऊ लागली. फिनिशलाइन अजून ७०० मी. अंतरावर होती. जॉनीच्या थोड्या मागे त्याचा भाऊ अॅलेस्टेयर धावत होता. जॉनी चक्कर येऊन पडणार हे अॅलेस्टेयरने पाहिले. अॅॅलेस्टेयर जॉनीच्या जवळ आला आणि खांद्यावर हात ठेवून त्याला आधार दिला. त्याला असेच घेऊन अॅलेस्टेयर फिनिश लाइनपर्यंत धावला. या वेळीसुद्धा अॅलेस्टेयरने जॉनीला आपल्या आधी फिनिश लाइन ओलांडू दिली. नंतर त्याने स्वत: फिनिश लाइन ओलांडली. या सर्व नाट्यमय घटनेनंतरसुद्धा जॉनी दुसऱ्या तर अॅलेस्टेयर तिसऱ्या क्रमांकावर आला. स्पेनच्या मारियोने रेस जिंकली.
अॅलेस्टेयर म्हणाला, “माझा भाऊ चॅम्पियन होताना मला बघायचे होते. येथे खूप उकाडा होता. जॉनी बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होता. माझी प्रतिक्रिया नॉर्मल होती. जॉनीच्या जागी आणखी दुसरा खेळाडूसुद्धा असता तर मी त्याची मदत केली असती.’ तर जॉनीने रुग्णालयातून आपला एक व्हिडिओ शेअर केला. यात तो म्हणाला, “तुझा प्रामाणिकपणा जबरदस्त आहे. अखेरच्या क्षणी विजयाचा विचार न करता तू माझ्याबाबत विचार केला. धन्यवाद.’
आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉनने या प्रकरणी जॉनीविरुद्ध स्पॅनिश फेडरेशनची अपिल फेटाळली आहे. जॉनीने मदत घेतल्यामुळे स्पॅनिश फेडरेशनने प्रश्न निर्माण केले होते. मात्र, दोन्ही भावांनी कोणताच नियम मोडलेला नाही, असे आंतरराष्ट्रीय फेडरेशनने म्हटले. नियमानुसार खेळाडू एकमेकांची मदत करू शकतात. खेळाडू टेक्निकल आणि रेस ऑफिशियलची मदत घेऊ शकतात.
छायाचित्र: भावाला सावरताना अॅलेस्टर (उजवा).
बातम्या आणखी आहेत...