आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिसाची रक्कम दुप्पट; विजेत्या संघास 3 काेटी, प्राे कबड्डी लीग 28 जुलैपासून; 12 संघांचे 138 सामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - अल्पावधीत लाेकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या प्राे कबड्डी लीगच्या पाचव्या सत्राला अाता २८ जुलैपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेची लाेकप्रियता अधिक वाढण्यासाठी अाणि कबड्डीला चालना देण्यासाठी अाता अायाेजकांनी नवा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार यंदा लीगमधील बक्षिसाच्या रकमेत  दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय जाहीर झाला.
 
नव्या निर्णयानुसार अाता चॅम्पियन ठरलेल्या टीमला ३ काेटी अाणि स्मृतिचिन्ह देऊन गाैरवण्यात येईल. तसेच फायनलमधील पराभवाने उपविजेत्यावर समाधान मानणारा संघ १ काेटी ८० लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. याशिवाय तिसरे स्थान गाठणाऱ्या संघास १ काेटी १२० लाखांचे बक्षीस दिले जाईल. तसेच सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावणाऱ्या खेळाडूला १५ लाखांचे बक्षीस देण्यात येईल.  त्यामुळे यासाठी अाता ६ काेटी १५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेची तरतूद करण्यात अाली.  यंदा १२ संघ सहभागी हाेतील. त्यामुळे अाता १२ टीममध्ये एकूण १३८ सामने हाेतील.
 
बक्षिसांचा वर्षाव
पदक -  बक्षीस रक्कम  
सुवर्ण - ३ काेटी
राैप्य - १ काेटी ८० लाख
कांस्य - १ काेटी २० लाख
सर्वाेत्कृष्ट - खेळाडू१५ लाख
एकूण -  ६ काेटी १५ लाख