आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३०० वा गोल केल्यानंतर नेमार झाला जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटाल (ब्राझील) - बोलिव्हियाविरुद्ध फुटबॉल वर्ल्ड क्वालिफायर सामन्यात ब्राझीलच्या नेमारला आपले कौशल्य दाखवणे महागात पडले. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला गोल करून त्याने संघाला आघाडी मिळवून दिली. हा नेमारच्या कारकीर्दीचा ३०० वा गोल ठरला.

यजमान संघाने पहिल्या हाफमध्येच चार गोल करून सामन्यावर पकड मिळवली होती. सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला नेमारने नटमेग (खेळाडूंच्या पायातून चेंडू ड्रिबल करून बाहेर काढणे) करून बोलिव्हियाच्या यासमनीला चकवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात यासमनीचा कोपरा नेमारच्या डाव्या डोळ्याजवळ लागला. त्याच्या चेहऱ्यावरून रक्त वाहू लागले. तो मैदानावरच आडवा झाला. टीम डॉक्टरांनी त्याला मैदानाबाहेर नेेले. मैदानावरील ३० हजार प्रेक्षकांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिले.

जखमी झाल्यामुळे नेमार जवळपास एक आठवडा मैदानापासून दूर झाला आहे. त्याला या सामन्यात तिसरे यलो कार्ड दाखवण्यात आले. यामुळे तो मंगळवारी व्हेनेझुएलाविरुद्ध खेळू शकणार नाही. यात नेमारशिवाय फिलिप कुटिन्हो (२५ वे मिनिट), फिलिप लुईस (३८ वे मिनिट) व गॅब्रियल जिसस तसेच रोबर्टो फिर्मिनो (७५ वे मिनिट) यांनी गोल केले. ब्राझील गुणतालिकेत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. नेमारने ७३ व्या सामन्यात ४९ वा गोल करून ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत जिकोला मागे टाकले. तो आता ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
बातम्या आणखी आहेत...