आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेमारचा ‘सुवर्ण’ गोल- शूटअाऊटमध्ये ब्राझीलची जर्मनीवर 5-4 ने मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे- यजमान ब्राझील फुटबाॅल संघ अापल्या अाॅलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन ठरला. ब्राझील संघाने घरच्या मैदानावर रिअाे अाॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. स्टार खेळाडू नेमारच्या गाेल्डन पेनॉल्टीच्या बळावर यजमान संघाने फायनलमध्ये शानदार विजय संपादन केला. ब्राझीलने अंतिम सामन्यात जर्मनीवर शूटअाऊटमध्ये ५-४ अशा फरकाने मात केली. निर्धारित वेळेत ही रंगतदार लढत १-१ ने बराेबरीत राहिली हाेती.
ब्राझीलसाठी नेमारने (२६ मि.) अाणि जर्मनीकडून मॅक्समिलियनने (५९ मि.) सामन्यात प्रत्येकी एक गाेल केला. त्यानंतर या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटअाऊटमध्ये लावण्यात अाला. यात यजमान ब्राझीलचा संघ वरचढ ठरला.
नेमारने अापल्या नेतृत्वात सरस कामगिरी करताना यजमान टीमला घरच्या मैदानावर एेतिहासिक सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. त्याच्या प्रभावी नेतृत्वात यजमान टीमने सरस कामगिरी करताना फायनलपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठला. अापल्या नेतृत्वात टीमला किताब मिळवून देण्याच्या इराद्यानेच नेमार घरच्या मैदानावर उतरला हाेता.
त्याने सरस कामगिरी करताना ब्राझीलला अंतिम सामन्यात अवघ्या २६ मिनिटांत अाघाडी
मिळवून दिली. त्यानंतर टीमने सामन्यावरची अापली पकड अधिक मजबूत केली. दरम्यान, मॅक्स मेयरच्या नेतृत्वात नशीब अाजमावणाऱ्या जर्मनीने मध्यंतरापर्यंत केलेले प्रयत्न अपुरे ठरले. मात्र, त्यानंतर मॅक्समिलियनने जर्मनीसाठी गाेलचे खाते उघडले. त्यामुळे जर्मनीला ५९ व्या मिनिटाला सामन्यात बराेबरी साधता अाली. मात्र, त्यानंतर निर्धारित वेळेपर्यंत दाेन्ही संघांचा अाघाडीचा प्रयत्न यशस्वी हाेऊ शकला नाही. परिणामी ही रंगतदार लढत १-१ ने बराेबरीत राहिली. त्यानंतर पेनल्टी शूटअाऊटमध्ये नेमारने सरस खेळी केली. यात शानदार पेनल्टी मारून त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे ब्राझीलला ५-४ ने विजय मिळवता अाला.
नायजेरियाला कांस्यपदक
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये नायजेरियानेे होंडुरसचा पराभव केला. नायजेरियाने ३-२ अशा फरकाने सामना जिंकून कांस्यपदकाचा बहुमान पटकावला.
नेमारने नेतृत्व साेडले
यजमान ब्राझील संघाला एेतिहासिक किताब मिळवून दिल्यानंतर नेमारने अापल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व साेडले. त्याने फुटबाॅल टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. ‘मी चॅम्पियन म्हणून घाेषित झालाे अाहे. कर्णधारपदाची जबाबदारी मला यशस्वीपणे पार पाडता अाली. या वेळी सहकाऱ्यांचे मला चांगले सहकार्य मिळाले,’अशी प्रतिक्रिया नेमारने दिली. प्रशिक्षक टिटे यांना मी टीमसाठी नव्या कर्णधाराचा शाेध घेण्याचे सांगितले, असेही ताे म्हणाला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...