आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलानंतर ३४ वर्षांनी मुलगाही चॅम्पियन !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी - जर्मनीचा निको रोसबर्गने अबुधाबी ग्रां.प्री.मध्ये जोरदार संघर्षानंतर दुसरे स्थान मिळवत पहिल्यांदा फॉॅर्म्युला वनची विश्व चॅम्पियनशिप जिंकली. रोसबर्गला फॉर्म्युला वन विश्व चॅम्पियन बनण्यासाठी या रेसमध्ये टॉप-३ मध्ये स्थान मिळवले गरजेचे होते. त्याने दुसऱ्या स्थानासह आपल्या शानदार करिअरमध्ये ते स्थान मिळवले, जे ३४ वर्षांपूर्वी त्याचे वडील केेके यांनी मिळवले होते. केके रोसबर्ग १९८२ मध्ये फॉर्म्युला वन चॅम्पियन बनले होते.अबुधाबी ग्रांप्रीचे विजेतेपद मिळवण्याचे श्रेय रोसबर्गच्या मर्सिडीझ संघाचा सहकारी लुईस हॅमिल्टनने मिळवले. त्याने या सत्रात आपला दहावा आणि सलग चौथा विजय मिळवला. मात्र, रोसबर्गला चॅम्पियन बनण्यापासून तो राेखू शकला नाही.
रोसबर्ग आणि त्याचा संघ सहकारी विश्व चॅम्पियन हॅमिल्टन २००० मध्ये गो कार्टवर सोबत रेसिंग करायचे. रोसबर्गने वयाच्या १७ व्या वर्षी विल्यम्स टीमसाठी चाचणी दिली होती. रोसबर्गने लंडन युनिव्हर्सिटी ऑफ इंपिरियल कॉलेजमध्ये अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकण्याची संधी धुडकावली. रोसबर्गने फॉर्म्युला वनमध्ये आपले पर्दापण २००६ मध्ये बहरिनमध्ये विल्यम्सकडून केले. २००८ मध्ये त्याने पहिल्यांदा एफ वनचे पोडियम गाठले.
पाच भाषा येतात;

वडिलांची भाषा येत नाही
३१ वर्षीय रोसबर्गने शूमाकर आणि सेबेस्टियन वेटेलनंतर आपल्या देशाकडून तिसरा विश्व चॅम्पियन बनला आहे. त्याचे वडील केके रोसबर्ग यांनी फिनलँडकडून सहभाग घेतला होता. निकोची आई जर्मनीची आहे. रोसबर्ग मोनाको येथे मोठा झाला. तो आतासुद्धा मोनाको येथेच पत्नी विवियन आणि मुलगी एलियासोबत राहतो. रोसबर्गला ५ भाषा येतात. मात्र, आपल्या वडिलांची फिनलँडची भाषा त्याला येत नाही.
बातम्या आणखी आहेत...