आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निक्की बेलाने असे काही केले की रेफरी पण झाला हैराण, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE स्मॅक डाऊनमध्ये एकमेंकींना भिडलेल्या निक्की बेला आणि नताल्या... - Divya Marathi
WWE स्मॅक डाऊनमध्ये एकमेंकींना भिडलेल्या निक्की बेला आणि नताल्या...
स्पोर्ट्स डेस्क-  WWE च्या स्मॅकडाऊन लढतीत निक्की बेला आणि नताल्या यांच्यात मॅच झाली. मात्र, ही लढत अधिकृतपणे सुरु होण्याआधीच या दोन रेसलर्सनी असा काही गोंधळ घातला की ही मॅच निकालाशिवाय थांबवावी लागली. या दरम्यान दोघी रेसलर्सनी एकमेंकींना जोरदार मारहाण केली. ज्यात दोघींनीही मर्यादा ओलांडल्या. रेफरीही झाला हैराण...
 
- या फाईटच्या आधी नताल्याने निक्की बेलावर जोरदार राग काढला होता. 
- खरं तर मॅच सुरु होण्याआधीच नताल्या बॅकस्टेजकडे असलेल्या निक्कीजवळ गेली आणि तिच्यावर हल्ला केला.
- यामुळे  निक्कीचा राग अनावर झाला आणि तिने सर्व मर्यादा ओलांडत नताल्याची धुलाई सुरु केली. 
- हे सर्व तेव्हा सुरु होते जेव्हा मॅच सुरु झाल्याची अधिकृत रिंग सुद्धा वाजली नव्हती.
 
रेफरी झाला हैराण- 
 
- निक्की बेला ज्या पद्धतीने नताल्यावर जबरदस्त प्रहार करत होती ते पाहून रेफरी हैराण झाला होता.
- आपल्यावर हल्ला झाल्याचे पाहून भडकलेली निक्की वेड्यासारखी नताल्याच्या मागे लागली आणि तिने तिच्यावर जोरदार हल्ला केला.
- यानंतर नताल्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, निक्कीने तिला परत रिंगमध्ये खेचून आणले.
- निक्कीकडून नताल्या वाईट पद्धतीने मार खात होती. याच दरम्यान नताल्याला सुद्धा एक संधी मिळाली. 
- संधी मिळताच नताल्याने निक्कीच्या डाव्या पायावर जोरदार प्रहार केला व तिला जखमी केले.
- तेव्हा सिक्यूरिटीला मधे पडावे लागले, ज्यांनी दोघींनी वेगवेगळे केले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नताल्याने कशा पद्धतीने निक्की बेलाच्या हातचा मार खाल्ला.....
बातम्या आणखी आहेत...