आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरवर्तनप्रकरणी भारतीय हाॅकी टीमच्या गुरबाजवर नऊ महिन्यांची बंदी!,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गैरवर्तनप्रकरणी भारतीय हाॅकी टीमच्या गुरबाजसिंगवर बंदीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात अाला अाहे. हाॅकी इंडियाच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत गुरबाजला अागामी नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्यामुळे अाता गुरबाजला अागामी ९ मे २०१६ पर्यंत खेळता येणार नाही. हरविंदरसिंग यांच्या नेतृत्वात समितीने हा निर्णय जाहीर केला. या शिस्तपालन समितीमध्ये हरविंदरसिंग यांच्यासह माजी खेळाडू अार. पी. सिंग, सुब्बाईह अाणि जसजित हांडा यांचाही समावेश अाहे.

दिल्ली वेव्हरायडर्सचे सरदारासिंगला रेड कार्ड
गत चॅम्पियन दिल्ली वेव्हरायडर्स फ्रँचायझीने अागामी सत्राच्या हाॅकी इंडिया लीगसाठी नव्याने अापल्या टीमच्या नेतृत्वात बदल करण्याचे संकेत दिले अाहेत. यासाठी दिल्लीच्या टीमने अापला कर्णधार सरदारासिंगला रेड कार्ड दिले अाहे. या वेळी टीमने त्याला रिलीज केले. दुसरीकडे अापल्या टीममधील सहा खेळाडूंचे स्थान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.