आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फी वाढीची मागणी करणे अनिल कुंबळेंना भोवले? टीम इंडियाकडून नवीन कोचचा शोध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचे हेड कोच अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. बीसीसीआयने कुंबळेंचा कार्यकाळ वाढवलाच नाही. तसेच क्रिकेट बोर्डाने नवीन प्रमुख कोच नियुक्त करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.
 
फी वाढवण्याची मागणी भोवली?
विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी प्रशिक्षक ठरलेले कुंबळे यांना बीसीसीआयने थेट नियुक्ती दिली होती. तरीही चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वीच अशा प्रकारची घोषणा करण्यात आल्याने बोर्ड कुंबळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कुंबळेंनी आपली आणि आपल्या संघातील सदस्यांची फी वाढवण्याची मागणी केली होती. यावरूनच बोर्ड त्यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. 
 
सचिन, गांगुली आणि लक्ष्मण घेणार मुलाखती
- बीसीसीआयने दिलेल्या माहितीप्रमाणे, टीम इंडियाचे हेड कोच पद मिळवण्यासाठी 31 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 
- क्रिकेट एडव्हायजरी कमिटीचे सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. 
- हेड कोच नियुक्ती पारदर्शक आणि निःपक्ष करून घेण्यासाठी कमिटीने निवडलेले सदस्य संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...