आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोपिंग प्रकरण: नरसिंग यादवला क्लीन चिट, आता ऑलिम्पिकमध्ये शड्डू ठोकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पानिपत - मल्ल नरसिंग यादव डोपिंगच्या आरोपांतून मुक्त झाला आहे. राष्ट्रीय डाेपिंगविरोधी संस्थेकडून (नाडा) क्लीन चिट मिळाल्याने नरसिंगचा रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागाचा मार्ग सुकर झाला आहे. वादावर पडदा पडल्यानंतर नरसिंग म्हणाला, अखेर सत्याचाच विजय झाला. मी निष्कलंक ठरेन, यावर विश्वास असल्याने सराव करणे सोडले नव्हते. नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी तपास आयोगाचा निकाल सुनावताना सांगितले की, नकळत प्रतिबंधित अाैषध घेतल्याचे नरसिंगला माहीत नव्हते. यामुळे त्याच्याविरुद्ध कट रचण्यात आल्याच्या दाव्याला दुजोरा मिळतो. सराव करताना खाण्यापिण्याच्या गोष्टींवर नजर ठेवणे अशक्य आहे. यामुळे असे प्रकार खेळाडूचे अपयश आहे, असे समजले जाऊ शकत नाही.
पुढे काय?
ऑलिम्पिकमध्ये प्रवीण राणाऐवजी नरसिंगला संधी दिली जावी, अशी विनंती भारतीय कुस्ती महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेला केली आहे.
सरकार व महासंघाची साथ :
- नरसिंगचा खासगी खानसामा चंदन व विनोद व राजेश या सोनिपतच्या साई सेंटरचे मेस कर्मचाऱ्यांच्या जबाबानुसार नरसिंगच्या जेवणात काहीतरी मिसळण्यात आले होते. भाजीतून फेस आल्यामुळे ती फेकावी लागली होती.
- नरसिंगला रोखण्याचे कसे कसे प्रयत्न झाले हे कुस्ती महासंघाने आपल्या अहवालात नाडाला कळवले होते. पीएमओ, क्रीडा मंत्रालयानेही नरसिंगची साथ दिली. तो जर दोषी असता तर असे झाले नव्हते.
भारत व माझ्यासाठी सुवर्णपदक अाण...
ही आनंदाची बाब आहे. नरसिंगला माझा आधीही पाठिंबा होता आणि आताही आहे, उद्याही राहील. नरसिंग जा देशासाठी आणि माझ्यासाठी सुवर्णपदक जिंकून आण... (मल्ल सुशीलकुमारचे ट्विट)
पदकाऐवजी कलंक धुण्याचा विचार
डोपमुक्तीनंतर नरसिंगने सर्वप्रथम दिव्य मराठी नेटवर्ककडे प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, आठ दिवसांपासून माझ्या डोक्यात ऑलिम्पिक पदक नव्हे तर डोपिंगमुक्त कसे व्हायचे हाच विचार होता. आज रात्री मी सुखाने झोपेन आणि उद्या सकाळी उठून पुन्हा जोमाने ऑलिम्पिकसाठी सराव करेन.
या तथ्यांवर निर्दोषत्व सिद्ध
>नरसिंगने चूक केली नाही, ना निष्काळजीपणा केला. तो प्रतिस्पर्ध्याच्या कटाचा बळी ठरला. २ जूनपूर्वी नरसिंगचा एकही नमुना पाॅझिटिव्ह आढळला नव्हता.
>नरसिंगवर सेवनाचा आराेप असलेले मेथॉयडिएनोन हे प्रतिबंधित अाैषध वजन वाढण्यासाठी घेतले जाते. त्याचे वजन ८१ किलो आहे आणि त्याला खेळायचे होते ७४ किलो वजनी गटात. अशा स्थितीत ऑलिम्पिकच्या तोंडावर एखादा खेळाडू वजन वाढवणारे उत्तेजक का घेईल?
>नरसिंगचा रूम पार्टनर संदीपही डोपिंगमध्ये अडकला होता. त्याला तर जवळच्या काळात कोणत्याही स्पर्धेत खेळायचे नव्हते. तो तर नरसिंगचा सराव करवून घेत होता.
लाइफलाइन शक्य
रिओत वाडा खेळाडूंची डोप टेस्ट घेईल. त्याच्या शरीरात प्रतिबंधित औषध आढळल्यास कारवाई शक्य आहे. मात्र, ही शक्यता कमीच आहे. कारण शरीरात स्टेरॉइड्सचे अंश जास्तीत जास्त २० ते २७ दिवसांपर्यंत राहतात. नरसिंगची लढत १७ अॉगस्टला अाहे. यामुळे त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे.
बातम्या आणखी आहेत...