आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा; अद्याप नियमावलीच तयार हाेईना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- पारंपरिक संस्कृतीचा माेठा वारसा लाभलेली दहीहंडी दरवर्षी महाराष्ट्रातील बाळगाेपालांमधील उत्साहाने लाेकप्रियतेची उंची गाठते. यामुळे दिवसेंदिवस या खेळाची क्रेझ वाढत अाहे. हिच लाेकप्रियता लक्षात घेऊन क्रीडामंत्री विनाेद तावडे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. मात्र, मागील दाेन वर्षांपूवी घाेषणा हाेऊनही याला चालना मिळेना. यासाठीची काेणत्याही प्रकारची मार्गदर्शिका तयार करण्यात अाली नाही. याकारणाने नुसत्याच घाेषणेच्या पाेकळ अाधारावर ही दहीहंडी उभी केली जात असल्याचे दिसते. गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सव सांस्कृतिक परंपरा जपणारा अाहे. दहीहंडीसाठी रचणाऱ्या मानवी मनोऱ्यांमुळे साहसी खेळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला.

शासन निर्णयाला चालना मिळेना
घाेषणेनंतर वर्षभरात यासाठी शासन निर्णय काढण्यात अाला. यामध्ये या खेळासाठी मार्गदर्शिकेची तरतूद करण्यात अाली. यासाठी समिती स्थापना स्पष्ट करण्यात अाले. यानुसार याच्या नियमावलीचा शासन निर्णय अाहे.

दाेन वर्षांपासून समिती नुसती नावालाच
दहीहंडीसाठी नियमावली तयार करणे, याला चालना देणे अाणि राज्यात प्रसार अाणि प्रचार व्हावा यासाठी दाेन वर्षांपूर्वी एका समितीची स्थापना करण्यात अाली. या सहासदस्यीय समितीमध्ये अा. अाशिष शेलार, अा. जितेंद्र अाव्हाड, अा. माेरे यांच्यासह तिघांचा समावेश अाहे.

या नियमांची उभारणी अपेक्षित
- किती थरांची उभारणी   
- खेळाडूंची संख्या अनिश्चित  
- खेळाचे नियम स्पष्ट हाेईनात.
- प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शिका नाही.
- वेळ अाणि गुणांचे समीकरणही उमजेना.
- जिल्हा, राज्य स्पर्धेतही समावेश हाेईना.
बातम्या आणखी आहेत...