आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Ronaldo No Goals As Man City Real Madrid Draw In Champions League

चॅम्पियन्स लीग: नो रोनाल्डो..नो गोल..सामना ड्रॉ !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर- चॅम्पियन्स लीगमध्ये यंदाच्या मोसमात भन्नाट खेळाच्या आधारे सर्वाधिक गोल करणारा स्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीमुळे उपांत्य फेरीच्या पहिल्या चरणातील सामन्यात मँचेस्टर सिटीने रिअल माद्रिदला गोलशून्य स्थितीत बरोबरीत रोखले. या सामन्यातील उभय संघांच्या संथ खेळामुळे प्रेक्षकही कंटाळले.

दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर राहिल्यामुळे रोनाल्डोला त्याच्या वैयक्तिक १६ गाेलच्या संख्येत वाढ करता आली नाही. ही लढत बरोबरीत संपल्यामुळे अंतिम चरणात धडकण्याच्या माद्रिदच्या आशांना मँचेस्टर सिटीने धक्का िदला आहे. पुढच्या आठवड्यापासून बेर्नाबेऊ येथे परतीच्या लढतींना सुरुवात होणार आहे.

या सामन्यात रिअल माद्रिदच्या खेळाडूंना सूरच गवसला नाही. त्यांनी अनेक नामी संधी वाया घालवल्या. आम्ही तसा बचवात्मक आणि रटाळ खेळ केला तरी सामना वाचवण्यात यशस्वी ठरलो, असे मत सिटी संघाचे व्यवस्थापक मॅन्युअल पेलेग्रिनी यांनी व्यक्त केले. यानंतरही बर्नाबेऊ येथेही आम्ही अशाच प्रकारे खेळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
रिअल माद्रिदच्या खेळाडूंनी त्यांच्या ख्यातीनुसार या सामन्यात खेळच केला नाही. त्यांनी आणखी आक्रमकपणे खेळ केला असता तर मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंवर दडपण वाढले असते आणि त्यामुळे गोल करण्याच्या आणखी संधी त्यांना िमळाल्या असत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तिकडे मध्यंतरानंतर दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झालेल्या रोनाल्डो करीम बेन्झेमा यांच्या अनुपस्थितीत आम्ही चांगला खेळ केला. ते परतीच्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होतील, अशी आशा झिनेदीन झिदानने व्यक्त केली.