आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेवाक योकोविकने केले पेसचे अभिनंदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारताचा सर्वांत अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसचे जगातला नंबर वन टेनिसपटू आणि विम्बल्डन पुरुष एकेरीचा चॅम्पियन सर्बियाच्या नोवाक योकोविकने दुहेरीचे विजेते जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर पेस ऑल इंग्लंड क्लबच्या बाहेर मीडियाशी बोलत असताना योकोविक आपल्या गाडीने तेथून जात होता. पेसला बघून योकोविकने आपली गाडी थांबवून हात दाखवून पेसचे अभिनंदन केले. पेसने प्रत्युत्तरात हात उंच करून त्याला अभिवादन केले. "वेल डन ब्रदर. तू मला प्रेरित केले. त्याने कितीतरी किताब जिंकले आहेत. शिवाय नंबर वन खेळाडू असताना त्याचे मन किती मोठे आहे. विम्बल्डनमध्ये एकेरीचा किताब जिंकल्याबद्दल तुझेही अभिनंदन नाेवाक योकोविक,'असे मिश्र दुहेरीतील चॅम्पियन लिएंडर पेसने या वेळी म्हटले.