आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेवाक याेकाेविक, सिमाेना हालेपने जिंकला राॅजर चषक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेरंटाे - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि राेमानियाची सिमाेना हालेप कॅनडातील राॅजर चषक टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या दाेन्ही अव्वल टेनिसपटूंनी अनुक्रमे पुरुष अाणि महिला एकेरीचा किताब पटकावला. तसेच मकाराेवा अाणि एलेना वेस्निनाने महिला दुहेरीचे अजिंक्यपद अापल्या नावे केले. इयान डाेडिंग अाणि मेलाे ही जाेडी पुरुष दुहेरीच्या किताबाची मानकरी ठरली.

सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने रंगतदार सामना ६-३, ७-५ अशा फरकाने जिंकला. यासह त्याला विजेतेपदावर अापले नाव काेरता अाले. अव्वल मानांकित याेकाेविकचे अापल्या करिअरमधील या स्पर्धेचे हे चाैथे जेतेपद ठरले. ताे या स्पर्धेत चाैथ्यांदा चॅम्पियन ठरला अाहे. पराभवामुळे तिसऱ्या मानंकित निशिकाेरीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वेळी त्याने विजयासाठी दिलेली झुंज सपशेल अपयशी ठरली.

हालेपची दुहेरी मुकुटाची संधी हुकली : राेमानियाच्या सिमाेना हालेपला स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन करण्याची संधी हाेती. मात्र, तिला अपयशाला सामाेरे जावे लागले. तिला केवळ एकेरीच्या किताबावर नाव काेरता अाले. हालेपने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मेडिसन केयासवर मात केली. तिने ७-६, ६-३ ने सामना जिंकला. दुसरीकडे महिला दुहेरीत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हालेप अाणि निसुलेस्कुला फायनलमध्ये मकाराेवा अाणि वेस्निनाने ६-३, ७-५ अशा फरकाने पराभूत केले.
बातम्या आणखी आहेत...