न्यूयाॅर्क - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक आणि गतविजेता मरिन सिलिच यांच्यात अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची सेमीफायनल रंगणार आहे. या दाेन्ही तुल्यबळ टेनिसपटूंमधील ही लढत मिनी फायनलसारखी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे चाहत्यांची या सामन्याकडे नजर लागली आहे. दुसरीकडे पुरुष एकेरीच्या दुसर्या उपांत्य सामन्यात स्विसचा राॅजर फेडरर आणि स्टॅन वावरिंका समाेेरासमाेर असतील.
या जेतेसाठी त्याला सेमीफायनलमध्ये गतविजेत्या मरिन सिलिचच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. मात्र, कसून सराव आणि अनुभवाच्या बळावर उपांत्य सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणण्याचे याेकाेविकचे मनसुबे आहेत. त्यासाठी ताे सज्ज झाला आहे.
दुसरीकडे स्वीसकिंग राॅजर फेडरर समोर वावरिंकाचे तगडे आव्हान असेल. फ्रेंच आेपनचा किताब जिंकून वावरिंकाने टेनिस विश्वात
आपली नवीन आेळख निर्माण केली. या वेळी त्याला टेनिसच्या विश्वातील अव्वल चार दिग्गजांचे आव्हान माेडीत काढण्यासाठी नेहमीच कसून प्रयत्न करावा लागला. याच बळावर त्याने फ्रेंच आेपन जिंकली हाेती.
सेरेना-राॅबर्टा लढतीत पावसाचे व्यत्यय
महिला एकेरीच्या उपांत्य लढतीदरम्यान पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे शुक्रवारी जगातील नंबर वन सेरेना आणि राॅबर्टा व्हिन्सी यांच्यातील पहिला उपांत्य सामना हाेऊ शकला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी सेरेनाने केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेलेे. आता तिला विजयासाठी आता शनिवारची प्रतीक्षा करावी लागेल. याच पावसामुळे एकेरीच्या दुसरा उपांत्य सामनाही आता शनिवारी हाेईल. दुसर्या सेमीफायनलमध्ये सिमाेना हालेप आणि फ्लेविया पेनेट्टा समाेरासमाेर असतील.
नाेवाक याेकाेविकही फाॅर्मात
पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये फेलिसानाे लाेपेझला धूळ चारून नाेवाक याेकाेविकने उपांत्यफेरी गाठली. यासाठी त्याला चार सेटपर्यंत झुंज द्यावी लागली हाेती. यात दुसरा सेट गमावल्यानंतर दमदर पुनरागमन करून सर्बियाच्या याेकाेविकने हा सामना आपल्या नावे केला. त्याने ही रंगतदार लढत ६-१, ३-६, ६-३, ७-६ अशा फरकाने जिंकली हाेती. त्यामुळे त्याला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. आता उपांत्य लढतीत बाजी मारून जेतेपदाचा आपला दावा प्रबळ करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
मरिन सिलिच सज्ज
गत विजेता मरिन सिलिच जेतेपदावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी त्याला उपांत्य सामन्यात जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचा अडथळा पार करून फायनल गाठावी लागेल. मात्र, त्याच्यासाठी हा फायनलचा मार्ग अधिकच खडतर मानला जात आहे. त्याच्यासाठी अव्वल मानांकित याेकाेविकला नमवणे अधिक कठीण आहे. सर्बियाचा हा खेळाडू सध्या नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झालेला आहे. त्यामुळे त्याला नमवणे क्राेएशियाच्या सिलिचसाठी माेठे आव्हान असेल.
चाहत्यांची उत्सुकता पाण्यात
महिला एकेरीच्या उपांत्य लढतीदरम्यान आलेल्या पावसामुळे अनेक चाहत्यांच्या उत्सुकतेवर पाणी फेरले गेले. कारण सेरेना आणि राॅबर्टा यांच्यातील उपांत्य सामना पाहण्यासाठी माेठ्या संख्येने प्रेक्षक जमले हाेते.