आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन ऑलिंपिकसाठी पैलवान योगेश्वरला कांस्यऐवजी आता मिळाले रौप्यपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- योगेश्वर दत्तने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. आता ते रौप्यपदकात बदलले आहे. रौप्यविजेता मल्ल बेसिक कुदुखोव डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याचे पदक काढून घेण्यात आले आहे. आता ते योगेश्वरला दिले गेले आहे.

योगेश्वर उपउपांत्य फेरीत कुदुखोवकडून पराभूत झाला होता. कुदुखोव फायनल हरला. यानंतर तो डोपिंगमध्ये अडकला. प्रकरण क्रीडा लवादाकडे गेले. दरम्यान, कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. लवादाने निकाल राखीव ठेवला होता. रिओ ऑलिम्पिकमुळे तो सुनावण्यात आला नव्हता. त्यामुळे हे पदक भारताच्या योगेश्वर दत्तला देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...