आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now The Next Target London Chess Classic: Grandmaster Tania Sachdev

आता पुढचे टार्गेट लंडन चेस क्लासिक : ग्रँडमास्टर तान्या सचदेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारताची महिला ग्रँडमास्टर तान्या सचदेवने आपला सुमार फॉर्म मागे टाकत अखेर आशियाई कॉन्टिनेंटल महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. बुद्धिबळाच्या पटापासून फॅशन जगतापर्यंत गाजणाऱ्या तान्याने खूप दिवसानंतर पदक जिंकले. आता हा फॉर्म कायम ठेवताना पुढची लंडनची स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य ठरवले असल्याची प्रतिक्रिया तान्याने "भास्कर'शी बोलताना व्यक्त केली.

तान्याने यूएईच्या अल ऐनमध्ये ७ फेऱ्यानंतर ६ गुण मिळवत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. शानदार फॉर्म परत मिळवल्यानंतर तान्या मायदेशी परतली. परतल्यानंतर भास्करशी बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. आता पुढचे टार्गेट लंडन चेस क्लासिक आणि कतार ओपन चेस स्पर्धा आहे. या स्पर्धांत पदक जिंकण्याचे लक्ष आहे, असेही तिने म्हटले.
एशियन कॉन्टिनेंटल महिला रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे सामने कठीण होते. चिनी चेस स्टार तान जोंगयी आणि भारतीय खेळाडू पद्ममिनीसोबत खेळताना मला कठीण गेले. मात्र, मी माझी आघाडी कमी होऊ दिली नाही. मी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू शकले असते. मी खूप वेळ टॉपवर कायम होते. मात्र, चिनी खेळाडू तान जोंगयीसोबत माझे टायब्रेकर चांगले झाले नाही. यामुळे मला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, असे तिने नमूद केले.

आता लंडनला जिंकणार
सध्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. माझा फॉर्म कायम ठेवण्यासाठी मेहनत घेत आहे. सध्या सरावावर भर देत आहे. डिसेंबरमध्ये लंडन चेस क्लासिक आणि कतार ओपन चेस स्पर्धा आहे, असे ती म्हणाली.

अकादमी सुरू करणार
भविष्यातील खेळाडू घडवण्यासाठी मी निश्चितपणे विचार केला आहे. मी भविष्यात युवा खेळाडू घडवण्यासाठी बुद्धिबळ अकादमी सुरू करणार आहे.