आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंबर वन कायम; कर्बरने केला सत्राचा शेवट गाेड, सेरेना दुसऱ्या स्थानावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - जर्मनीची टेनिसस्टार एंजेलिक कर्बर अाता यंदाच्या सत्राचा शेवट गाेड करणार अाहे. तिने सत्रातील शेवटपर्यंत जागतिक क्रमवारीतील अापले नंबर वनचे स्थान कायम ठेवले. यासह तिला सत्राचा शेवट करता येणार अाहे. माजी नंबर वन सेरेना विल्यम्स क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम अाहे. गत महिन्यात झालेल्या पराभवामुळे तिला क्रमवारीतील अापले अव्वल स्थान गमावावे लागले. तिच्या नावे अाता ७,०५० गुण अाहेत. कर्बर ही ९,०८० गुणांच्या अाघाडीने नबंर वनच्या स्थानावर विराजमान झालेली अाहे. तसेच ५,६०० गुणांसह पाेलंडच्या रंदावास्काने क्रमवारीत तिसरे स्थान कायम ठेवले अाहे.

जर्मनीच्या कर्बरने सत्राच्या सुरुवातीला पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपनचा किताब जिंकला. त्यानंतर तिने सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन अाेपनच्या अजिंक्यपदावर नाव काेरले. यासह तिला क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठता अाले. तिने पहिल्यांदा हे स्थान पटकावले अाहे.

याच किताबाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या कर्बरने रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धाही गाजवली. तिने या स्पर्धेत महिला
एकेरीत राैप्यपदकाची कमाई केली. मात्र, तिची फायनलमधील झंुज अधिक लाेकप्रिय ठरली.

डब्ल्यूटीए क्रमवारी
१. एंजेलिक कर्बर (जर्मनी) ९,०८०
२. सेरेना विल्यम्स (अमेरिका) ७,०५०
३. अग्निजस्का रंदावास्का (पाेलंड) ५,६००
४. सिमाेना हालेप (राेमानिया) ५,२२८
५. डाेमिनिका सिबुलकाेवा (स्लाेव्हाकिया) ४,८७५
६. कॅराेलिना प्लिसकाेवा (चेक गणराज्य) ४,६००
७. मुगुरुझा (स्पेन) ४,२३६
८.मॅडिसन कीज (अमेरिका) ४,१३७
९. स्वेतलाना कुज्नेत्साेवा (रशिया) ४,११५
१०. याेहान्ना काेंटा (इंग्लंड) ३,६४०
बातम्या आणखी आहेत...