आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रजितचा रिअाे प्रवेश अडचणीत; चार वर्षे बंदीचे संकेत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवचा रिअाे अाॅलिम्पिकमधील प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याने डाेपिंगच्या चर्चेवर पडदा पडला अाणि डाेपिंगचे प्रकरण शांत झाले. मात्र,अाॅलिम्पिकला अवघे दाेन दिवस शिल्लक असतानाच गाेळाफेकपटू इंद्रजित सिंग हा अडचणीत सापडला अाहे. बी सॅम्पल पाॅझिटिव्ह अाल्याने भारताच्या या खेळाडूची अाॅलिम्पिक वारी अडचणीत सापडली अाहे. याशिवाय त्याच्यावर अाता डाेपिंग प्रकरणामुळे चार वर्षांच्या बंदीची कारवाई हाेण्याची शक्यता अाहे. या कारवाईचे त्याच्यावर सावट निर्माण झाले अाहे. त्यामुळे त्याला अाॅलिम्पिकमधून बाहेर जावे लागण्याचे चित्र अाहे. तसेच त्याच्यावर जागतिक डाेपिंगविराेधी संस्था (वाडा) कडक कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता अाहे. या डाेपिंगमुळे त्याचे करिअर पूर्णपणे वादाच्या भाेवऱ्यात अडकले अाहे. गत २४ जून राेजी राष्ट्रीय डाेपिंगविराेधी संस्थेने (नाडा) इंद्रजितची डाेप टेस्ट घेतली हाेती. या वेळी घेतलेल्या वैद्यकीय चाचणीत त्याने प्रतिबंधित स्टेराॅइड घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या मागेही कारवाईचा ससेमिरा सुुरू झाला.

भारताच्या २८ वर्षीय इंद्रजित सिंगने गत वर्षी फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत अव्वल कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत २०.६५ मीटर गाेळाफेक करून वर्ल्ड चॅम्पियनशिप अाणि रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले हाेते. त्याने दाेन वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये इचियाेन अाशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली हाेती.

मात्र, डाेपिंग चाचणीत ताे दाेषी अाढळला अाहे. ए सॅम्पल चाचणीत त्याने स्टेराॅइड एंड्राेस्टेराेन अाणि अॅटियाेक्लाेनाेलाेन घेतल्याचे समाेर अाले हाेते. त्यानंतर त्याची बी सॅम्पल चाचणीही पाॅझिटिव्ह अाली अाहे. मात्र, यात फेरबदल करण्यात अाल्याचा अाराेपही इंद्रजितने केला.

कट रचल्याचा अाराेप
माझ्याविरुद्धचा हा सर्वात माेठा कट अाहे. कुठेतरी माेठी गडबड झालेली अाहे. त्याचा तपास डाॅक्टर अाता करत अाहे. त्यामुळे मी यावर फार जास्त बाेलत नाही. माझ्या अहवालात माेठा फेरबदल करण्यात अाला अाहे,’असा अाराेप गाेळाफेकपटू इंद्रजित केला.
बातम्या आणखी आहेत...