आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेल्टमेन्स भारतीय हाॅकीचे प्रशिक्षक, रिआे अाॅलिम्पिकपर्यंत देणार प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाॅल वानची हकालपट्टी झाल्यानंतर अवघ्या दाेन दिवसांत भारतीय हाॅकी टीमला नवीन प्रशिक्षक मिळाला अाहे. हाॅकी इंडियाने परफाॅर्मन्स डायरेक्टर राेलेंट अाेल्टमेन्स यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. अागामी रिआे अाॅलिम्पिकपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. त्यामुळे अाता अाेल्टमेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली अाशियाई चॅम्पियन भारतीय हाॅकी संघ नशीब अाजमावणार अाहे.

‘अाेल्टमेन्स यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची तयारी दर्शवली अाहे. मागील तीन वर्षांपासून त्यांचे भारतीय संघाला माेलाचे याेगदान लाभले अाहे. अाता अागामी काळातही ते अापल्या मार्गदर्शनामध्ये काेणत्याही प्रकारचा खंड पडू देणार नाहीत,’ अशी प्रतिक्रिया हाॅकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी दिली. ६१ वर्षीय अाेल्टमेन्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे साेपवण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक श्रीनिवास अाणि बत्रा यांनी घेतला. यासाठी नुकतीच बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. अागामी स्पर्धांमध्ये भारतीय संघाला साेनेरी यश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार अाहे. त्यासाठी मलाही मेहनत घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त प्रशिक्षकांनी दिली.