आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायटनिंग बोल्ट पडद्यावर दिसणार की मैदानावर? याेजना अद्याप अनिश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- युसेन बाेल्ट ट्रॅकवर असतो तेव्हा त्याला फक्त लक्ष्य दिसते. अत्यंत स्पष्ट. फोकस लेव्हल इतका असतो की अंतर १०० मी. असो की २०० मीटरचे, तो अवघ्या काही सेकंदांत फिनिश लाइनवर दिसतो. असा वेगाने धावत धावत तो आता करिअरच्या फिनिश लाइनवर आला आहे.
मात्र, त्यापुढचे त्याचे लक्ष्य अजून स्पष्ट नाही. चर्चा बोल्टची आहे, यामुळेच ही बातमी आहे.
या वर्षी ऑगस्टमध्ये होणारी रिआे ऑलिम्पिक त्याच्या करिअरमधील अखेरची सर्वांत मोठी स्पर्धा असेल, असे बोल्टने आधीच म्हटले आहे. मात्र, ज्याचे नाव बोल्ट आहे, जो मैदानावर विजेच्या गतीने धावतो आणि चाहते ज्याला "लायटनिंग बोल्ट' म्हणतात तो निश्चितपणे रिकामा तर राहणार नाही. जगातला सर्वाधिक वेगवान धावपटू निवृत्तीनंतर काय करणार? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
पहिला पर्याय जमैकाच्या मुलांना ट्रॅक अँड फील्डसाठी ट्रेनिंग देणे होऊ शकेल. अर्थात, आणखी बोल्ट तयार करण्याचे प्रयत्न. या प्रकारे तो खेळ आणि चॅरिटीशी संलग्नित राहू शकेल. दुसरा पर्याय, विश्व स्पर्धेत आणखी नशीब आजमावणे. निवृत्ती यानंतरही शक्य आहे. तिसरा पर्याय रोचक आहे... चित्रपट किंवा टीव्ही वर अभिनय. महिला टीव्ही अँकरने एका कार्यक्रमात त्याला "चार्मिंग पर्सनॅलिटी' म्हटले. बोल्ट लगेचच म्हणाला, "माझ्या चेहऱ्याबाबत तुमचे काय विचार आहेत, हा चालेल काय?' हा बाेल्टचा विनोद होता की भविष्यातील त्याच्या योजनेचे संकेत? याचे उत्तर त्यालाच माहिती आहे. बोल्ट येत्या काही दिवसांत एका डॉक्युमेंट्रीत दिसेल. ही ब्रिटनमध्ये तयार होत आहे. तो टीव्हीवर झळकेल, हे तर निश्चित आहे. आणखी कुठे कुठे झळकेल बघूया.
हे लक्ष्य पूर्ण होऊ शकते...
बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सलग ३ सुवर्ण जिंकले आहेत. रिअोत १००, २०० आणि ४ x १०० मी. रिलेत विजेता ठरला तर तीन ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी ३ सुवर्ण जिंकणारा एकमेव धावपटू ठरेल.
...मात्र हे शक्य नाही
अमेरिकेचा खेळाडू कार्ल लुईसच्या विक्रमापासून दूरच राहणार. लुईसच्या नावे ९ सुवर्ण, १ रौप्य आहे. मात्र, बोल्ट जास्तीत जास्त सुवर्ण जिंकू शकेल. कारण तो तीन स्पर्धेतच सहभागी होत आहे.