आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Olympic Silver Medallist Shuttler PV Sindhu Defeated World Champion Nozomi Okuhara

अाेकु‘हारा’ची परतफेड; सिंधूने रचला इतिहास; 26 वर्षांत प्रथमच भारतीय चॅम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियाेल-  रिअाे अाॅलिम्पिक अाणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने  साेनेरी यश संपादन करून इतिहास रचला. तिने रविवारी काेरिया सुपर सिरीजचा किताब पटकावला. अशा प्रकारे या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. याशिवाय तिचे करिअरमधील सुपर सिरीजचे हे तिसरे विजेतेपद ठरले. गतवर्षी तिने दाेन सुपर सिरीज किताब पटकावले. यासह सिंधू ही २६ वर्षांच्या इतिहासात काेरियाच्या स्पर्धेत पहिली भारतीय चॅम्पियन ठरली अाहे.   
 
पाचव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन नाेजाेमी अाेकुहाराचा पराभव केला. तिने २२-२०, ११-२१, २०-१८ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने उल्लेखनीय खेळी करताना एक तास २३ मिनिटांमध्ये विजयश्री खेचून अाणली. याशिवाय तिने अाठव्या मानांकित अाेकुहाराचा अापल्याविरुद्ध सलग विजय मिळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच तिला गत  पराभवाची परतफेड केली.   
 
अाेकुहाराला पराभवाची परतफेड 
किताब विजेत्या पी.व्ही. सिंधूने अवघ्या दाेन अाठवड्यांत वर्ल्ड चॅम्पियन नाेजाेमी अाेकुहाराला पराभवाची परतफेड केली. ग्लासगाे येथील वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अाेकुहाराने भारताच्या सिंधूचा पराभव केला हाेता. मात्र, तिला हे वर्चस्व फार काळ कायम ठेवता अाले नाही. सिंधूने रविवारी काेरिया सुपर सिरीजच्या फायनलमध्ये अाेकुहारावर मात केली. यासह तिने पराभवाचा बदला घेतला. 
 
विजयात साधली बराेबरी 
सिंधू व  अाेकुहारा यांच्यात अातापर्यंत अाठ सामने झाले. यामध्ये दाेघींनी उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर प्रत्येकी ४ विजय संपादन केले अाहेत.
 
काेरिया सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय 
जागतिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या सिंधूने काेरिया सुपर सिरीज जिंकण्याची एेतिहासिक कामगिरी केली. ही सुपर सिरीज जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. अातापर्यंत भारताच्या काेणत्याही खेळाडूला या स्पर्धेच्या किताबावर नाव काेरता अाले नाही. यामध्ये माजी नंबर वन सायना नेहवालसह साईप्रणीतचा समावेश अाहे. 
बातम्या आणखी आहेत...