आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक सुवर्णानंतर आता शिकण्याची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातल्या बहुतेक मुलांना खेळणे आवडते. यासाठी शाळा किंवा शिक्षण सोडण्याचीही त्यांची तयारी असते. मात्र, चार ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेल्या मिसी फ्रँकलिनला आता पुन्हा शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे आहे. असे असताना ती रिओ ऑलिम्पिकमध्ये जलतरणात सर्वाधिक सुवर्ण जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे.

२० वर्षांच्या फ्रँकलिनने एका कार्यक्रमात आपले पत्र वाचले. यात तिने पालकांचे खास करून आभार मानले. ती म्हणाली, "खूप अडचणी असताना तुम्ही मला पूर्ण वेळ दिला. प्रत्येक सुविधा दिली. खेळ-शिक्षण यातील बालपण जगू दिले. तुमच्यामुळेच मी आज येथपर्यंत पोहोचू शकले. तुम्हाला भविष्यातसुद्धा माझ्या यशावर वाचण्याची संधी मिळेल आणि माझ्या यशावर तुम्हाला निश्चित अभिमान वाटेल, याची मी तुम्हाला खात्री देते. मला माझ्या आयुष्यात नेहमी एका गोष्टीची उणीव जाणवत राहिली. ती म्हणजे वर्ग आणि कॉॅलेजची उणीव. मला शिकायचे आहे. मला मानसशास्त्रात पदवी घ्यायची आहे,' असे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ६ सुवर्ण जिंकणाऱ्या फ्रँकलिनने म्हटले.

फ्रँकलिनने वयाच्या १७ व्या वर्षी लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सहभाग घेतला होता. त्या वेळी तिने चार सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते. यशानंतर ती सेलिब्रिटी ठरली. तिच्यावर प्रोफेशनल स्विमर बनण्याचा दबाव वाढू लागला. यानंतरही कॉलेजात शिकता यावे आणि सोबत खेळताही यावे म्हणून ती अमॅच्युअर स्विमिंग करत होती. २०१३ मध्ये तिने शिक्षणासोबत विश्व चॅम्पियनशिपमध्ये ६ सुवर्णपदके जिंकली. मात्र, रिओ ऑलिम्पिकसाठी ती अधिक गंभीर आहे. रिओच्या तयारीसाठी तिने शिक्षणातून एक वर्षाचा ब्रेक घेतला आहे. मात्र, तिचे लक्ष्य स्पष्ट आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर तिला पुन्हा शिकायचे आहे.

मी कॉलेजमध्ये अभ्यास आणि खेळ या दोन्हींत पुढे राहायचे. तेव्ही मी खूप व्यग्र होते. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. असे करणे मला आवडायचे. स्कूल, कॉलेजच्या वेळेत आपण प्रामाणिकपणे काम करत असतो. कठोर मेहनत घेत असतो. त्याग करतो. मात्र, दबाव किंवा चिंता नसते. ऑलिम्पिकच्या तयारीत मी खूप बिझी होते, तेव्हासुद्धा मी कॉलेजात दोन वर्षे काढली. देवाचे आभार की मी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकू शकले. त्या वेळीच मी इम्युनॉलॉजीमध्ये "ए' ग्रेड मिळवला होता. हा ए ग्रेड माझ्यासाठी ऑलिम्पिक पदकाइतकाच महत्त्वपूर्ण आहे.
बातम्या आणखी आहेत...