आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Last Time: Kobe Bryant's Final Road Trip Begins

संडे सेलिब्रिटी कोबे ब्रायंट: म्युझिक बँड बनवला, नंतर झाला एनबीएचा सुपरस्टार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या भेटीला येत आहे अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट. एनबीएत लॉस एंजलिस लेकर्सकडून खेळणारा कोबे या सत्रानंतर निवृत्ती घेणार आहे.
कोबे ब्रायंट शाळेत हाेता तेव्हा त्याला बास्केटबॉलसह संगीताचीही आवड होती. त्याने आपला म्युझिक बँड "चीजा' बनवला. म्युझिक अल्बमसुद्धा काढले. आपल्या बँडमध्ये तो रॅपरची भूमिका पार पाडत असे. बास्केटबॉलच्या सरावाला जाण्याआधी तो रोज रॅप शिकण्यास जायचा. हिप-हॉपही शिकायचा. मात्र, नशिबात एनबीएचा सुपरस्टार बनण्याचे लिहिले होते. यामुळे त्याच्या बँडला फार यश मिळाले नाही. आज तो अमेरिकन बास्केटबॉल लीग एनबीएमध्ये स्टार प्लेअर आहे.

कोबे ब्रायंटचे वडील जो ब्रायंटसुद्धा एनबीए खेळाडू होते. जोने आपल्या मुलाचे नाव जपानची सुप्रसिद्ध बीफ डिशवर ठेवले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच कोबेने बास्केटबॉल खेळण्यास सुुरुवात केली. आपली शाळा लोअर मेरियनकडून शानदार प्रदर्शन करताना त्याला राष्ट्रीय स्तरावर चांगली ओळख मिळाली. त्याने १९९६ मध्ये हायस्कूलमधून थेट एनबीएमध्ये प्रवेश मिळवला. बालपणापासून लॉस एंजलिस ही त्याची फेव्हरेट टीम होती. तो आयुष्यभर याच संघाकडून खेळत राहिला. तो २१ वर्षांचा असताना १९९९ मध्ये त्याची भेट एक म्युझिक व्हिडिओ बॅकग्राउंड डान्सर व्हेनिसा लेनेशी झाली. कोबेने २००१ मध्ये व्हेनिसाशी लग्न केले. या लग्नामुळे त्याचे आई-वडील खुश नव्हते. कोबेने लवकर लग्न केल्याचे त्यांना वाटत होते. याशिवाय व्हेनिसा अमेरिकन नव्हती. यामुळे कोबे आपल्या आई-वडिलांपासून वेगळा राहू लागला. २००३ मध्ये त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला. मात्र, हे प्रकरण न्यायालयाबाहेरच सुटले. काही िदवसांनंतर व्हेनिसा आणि त्याच्या संबंधात दुरावा आला. २०११ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी विनंती केली. मात्र दोन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाची विनंती मागे घेतली. पुढची दोन वर्षे तो गुडघा आणि खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. मात्र, २०१५ मध्ये त्याने कोर्टवर पुनरागमन केेले. कोबेने ३४ वर्षे १०४ दिवसांच्या वयात करिअरचा ३० हजारावा गुण मिळवला.
संपत्ती
तब्बल २८० कोटी मिलियन डॉलर.

रेकॉर्ड
{०५ वेळा एनबीए चॅम्पियन
{१८ वेळा एनबीए ऑल स्टार संघात सामील
{०२ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता
{लॉस एंजलिस लेकर्सचा अव्वल स्कोअरर
{एका गेममध्ये सर्वाधिक ८१ गुण स्कोअर करणारा दुसरा.