प्रिटोरिया- दक्षिण आफ्रिकेचा माजी पॅराअॅथलिट ऑस्कर प्रिस्टोरियसला आपली गर्लफ्रेंड रिवा स्टिनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला काय शिक्षा द्यावी, यावर प्रिटोरियाच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
यासंदर्भात रिवाचे वडील बॅरी स्टिनकॅम्प न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी प्रिस्टोरियसविरुद्ध साक्ष दिली. मुलीला गमावल्यानंतर एका पित्यावर दु:खाचा डोंगर कसा कोसळतो, हे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांनी अापल्या मनातील वेदना स्पष्ट केल्या. त्यांना अनावर झाले हाेते.
मनातील वेदनांना दिली माेकळी वाट!
> रिवाच्या खुनाला तीन वर्षे झाली आहेत. मात्र, तेव्हापासून मी नेहमी तिच्याच विचारात असतो. सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री.. माझ्या डोक्यात माझ्या रिवाचा चेहराच असतो. मुलगी गेल्यानंतर माझी पत्नी जूनसुद्धा कोलमडली आहे. मनाने खचली आहे. मी अनेक वेळा रात्रीला तिला रडताना आणि मुलीची आठवण काढताना पाहिले आहे. तिला काय त्रास होत असेल, हे मला माहिती आहे. तसाच त्रास मलाही होतो आहे. आम्ही प्रत्येक दिवशी, क्षणाक्षणाला दु:खात जगत आहाेत.
> ऑस्करला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, असे मला आणि जूनला वाटत नाही. मात्र, एका निर्दोष आणि निरागस मुलीची हत्या करणारा मोकाट फिरू नये. ऑस्करला तुरुंगात पाठवा, अशी मी न्यायालयाकडे मागणी करतो. त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायला हवी.
पुढील स्लाइडवर वाचा, त्यांनी न्यायालयात हे म्हटले...