आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंडची हत्या केल्याप्रकरणी ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियसला 6 वर्षाची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिटोरिया कोर्टाने ऑस्करला 6 वर्षाची शिक्षा सुनावताच पिस्टोरियसची फॅमिली दु:खी झाली. - Divya Marathi
प्रिटोरिया कोर्टाने ऑस्करला 6 वर्षाची शिक्षा सुनावताच पिस्टोरियसची फॅमिली दु:खी झाली.
प्रिटोरिया (दक्षिण अफ्रीका)- गर्लफ्रेंड रीवा स्टीनकॅंपची हत्या केल्या प्रकरणी दोषी आढळलेला पॅरालिंपिक अॅथलीट ऑस्कर पिस्टोरियसला बुधवारी 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पिस्टोरियस ही शिक्षा कोसी माम्पुरा जेलमधील हॉस्पिटलमध्ये पूर्ण करेल. येथे तो मागील एक वर्षापासून तुरुंगात आहे. याबाबत सांगितले जात होते की, त्याला किमान 15 वर्षाची शिक्षा सुनावण्यात येईल. मात्र, न्यायाधिश तोकोजीले मसीपा यांनी त्याला 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पिस्टोरियसला तुरुंगात पाठविण्यात आले आहे. पिस्टोरियसचे वकीलांनी वरच्या न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षा ऐकताच रडायला लागली बहिण...
- प्रिटोरिया कोर्टात शिक्षेची घोषणा होताना पिस्टोरियसची फॅमिली दु:खी होती.
- शिक्षा सुनावताच पिस्टोरियसचे वकीलाने सांगितले की, आम्ही शिक्षेच्या विरोधात हायकोर्ट किंवा इतर वरिष्ठ न्यायालयात जाणार नाही.
- याआधी ऑस्कर जानेवारीत कोर्टात हजर झाला होता. त्यावेळी तो कोर्टात प्रोस्थेटिक लेग्सशिवाय चालताना दिसला.
- याबाबत सांगितले गेले की, असे करून पिस्टोरियसला लोकांची सहानुभूती मिळवायची होती.
- या प्रकरणी प्रिटोरियाच्या हायकोर्टात सलग तीन दिवस सुनावणी सुरु होती.
- मात्र, पिस्टोरियसच्या वकीलाने कोर्टात मानसिक आजारपण आणि दोन्ही पाय नसल्याने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती.
काय आहे प्रकरण-
- ऑस्करवर 2013 मध्ये गर्लफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप आहे. पिस्टोरियसने वेलेन्टाइन डेच्या दिवशी आपल्या घरात गर्लफ्रेंडला गोळी मारली होती.
- ऑस्करने रीवावर चार गोळ्या झाडल्या होत्या. ज्यात तिचा मृत्यू झाला होता.
- मात्र, त्याने दावा केला होता की, घरात लाईट नसल्याने चोर आल्याचे समजून अंधारात गोळीबार केला होता.
- मात्र, न्यायाधिशांनी त्याचा दावा फेटाळून लावत त्याच्यावर हत्या केल्याचा आरोप ठेवत दोषी ठरविले होते.
ऑगस्ट, 2015 पॅरोलवर सुटला होता-
- ऑस्कर पिस्टोरियसला गेल्या वर्षी 21 ऑगस्ट रोजी पॅरोल मंजूर झाला होता.
- त्याआधी त्याने 10 महिने तुरुंगात घालवले होते. तेव्हा त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पाय नसताना जिंकले जगाला-
- ऑस्कर पिस्टोरियसची असा एक अॅथलिट म्हणून ओळख आहे की, ज्याने पाय नसताना जग जिंकायचे स्वप्न पाहिले व सत्यातही उतरवले.
- त्याने पॅरालिंपिकमध्ये मेडल जिंकले होते.
- लंडन ऑलिंपिकमध्ये तो सामान्य धावपट्टूसोबत धावला होता.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, ऑस्कर पिस्टोरियसचे गर्लफ्रेंड रीवासोबतचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...