आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकंदर उत्कृष्ट कामगिरी : रहाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे -झिम्बाब्वे दौऱ्यातील अंतिम अर्थात टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे निराश झाला. तरीही एकदिवसीय मालिकेत संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याची पावतीही त्याने दिली.

भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यात १० धावांनी पराभव स्वीकारवा लागला. वनडे मालिका ३-० ने जिंकली.

काहीही असले तरी या दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी एकूणच चांगली कामगिरी केली. अंबाती रायडू आणि केदार जाधवने शतक ठोकले. तसेच विजय व मी अर्धशतकी खेळी केली. असे असूनही आम्हाला फलंदाजीत सुधारणा कराव्या लागतील. खेळाडूंनी त्यांचा खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. क्रमवारीत वर चढण्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक खेळल्यामुळे त्याचा आम्हाला आनंद वाढला, असेही रहाणे म्हणाला.
हरभजनला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन
अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगला बाकावर बसवून त्याच्या जागी फलंदाजी मजबूत करण्याच्या दृष्टीने तरुण फलंदाज संजू सॅमसनला खेळवण्याच्या िनर्णयाचे रहाणेने समर्थन केले. भज्जी अनुभवी अन् सामना जिंकून देणारा गोलंदाज असला तरी संजयला खेळण्याची संधी द्यायची होती, असे तो म्हणाला.
बातम्या आणखी आहेत...