आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P.V. Sindhu Storms Into Denmark Open Quarter finals

डेन्मार्क ओेपन: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओडेन्से- भारताची युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूने शुक्रवारी डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील आपली विजयी मोहीम कायम ठेवली. तिने या वेळी मिळवलेल्या शानदार विजयाच्या बळावर महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

जागतिक स्पर्धेतील दोन वेळची कांस्यपदक विजेती सिंधूने दुसऱ्या फेरीत तिसऱ्या मानांकित यिंगचा पराभव केला. तिने २१-१२, २१-१५ अशा फरकाने शानदार विजयाची नोंद केली. यासह तिने अवघ्या ३४ मिनिटांमध्ये अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित केला.

सायना नेहवाल, के. श्रीकांत, कश्यपचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सिंधूने एकाकी झुंज देताना विजयी मोहीम कायम ठेवली. तिने शानदार खेळी करून एकतर्फी विजय संपादन केला. बिगरमानांकित सिंधूने लढतीमध्ये तिसऱ्या मानांकित यिंगचे आव्हान संपुष्टात आणले.