ओडेन्से - जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या पी. व्ही. सिंधूने रविवारी डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. तिला महिला एकेरीच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या मानांकित ली झुईरुईने अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव केला. तिने २१-१९, २१-१२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. याशिवाय तिने महिला एकेरीचा किताब जिंकला.
भारताच्या सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कॅरोलिना मरिनला पराभूत करून महिला एकेरीची फायनल गाठली होती. मात्र, तिला या सामन्यात समाधानकारक खेळी करता आली नाही. तिने विजयासाठी ४७ मिनिटे झुंज दिली. मात्र, चीनच्या खेळाडूने सरस खेळी करून विजय साकारला. सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सिंधूने सरस खेळी करून फायनल गाठली होती.