आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • P Harikrishna, SP Sethuraman Win In World Chess Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : पी. हरिकृष्णा, सेतुरमण विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाकू - भारतीय संघाला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दमदार सुरुवात करता आली. भारताचा अव्वल खेळाडू पी. हरिकृष्णा आणि ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरमणने स्पर्धेत शनिवारी शानदार विजयी सलामी दिली. यासह या दाेघांनी दिमाखदारपणे दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे नाशिकचा स्टार युवा खेळाडू विदीत गुजराथीचा सलामी सामना बराेबरीत राहिला. अझरबैजान येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत अव्वल १२८ खेळाडू सहभागी झाले आहेत.

हरिकृष्णाने सलामी सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या मॅक्स इर्लिंगवर्थचा पराभव केला. यासह त्याने पहिल्या फेरीत शानदार विजयाची नाेंद केली. त्यामुळे त्याला दुसर्‍या फेरीत प्रवेश करता आला. त्यापाठाेपाठ सेतुरमणने पहिल्या फेरीत रशियाच्या सननचा पराभव केला.

ब्रुझाेनने विदितला बराेबरीत राेखले
क्युबाचा ब्रुझाेन लाझाराे आणि भारताचा विदित गुजराथी यांच्यात पहिल्या फेरीचा सामना रंगला हाेता. अत्यंत रंगतदारपणे झालेल्या या सलामीच्या लढतीत क्युबाच्या खेळाडूने नाशिकच्या विदितला बराेबरीत राेखले. तसेच भारताच्या ललिथ बाबूने पाेलंडच्या राडाेस्लावविरुद्ध लढत बराेबरीत ठेवली. त्यापाठाेपाठ अधिबान आणि रशियाचा वाल्दिमीर फेडाेसीव यांच्यातील सामना ड्राॅ झाला.