आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पी.व्ही. सिंधूची यामागुचीवर मात - जागतिक सुपर सिरीज बॅडमिंटन फायनल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई : आठव्या मानांकित भारताच्या पी.व्ही. सिंधूने दुसऱ्या मानांकित जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध पहिला गेम हरल्यानंतर शानदार पुनरागमन करत बुधवारी जागतिक सुपर सिरीज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या ब गटात १२-२१, २१-८, २१-१५ ने विजय मिळवला.
सिंधूचा यामागुचीविरुद्ध ३-१ असा करिअर रेकॉर्ड झाला आहे. सिंधूने या वर्षी यामागुचीला उबेर कपमध्ये २१-११, २१-१८ ने तर गतवर्षी मकाऊ ओपनमध्ये २१-८, १५-२१, २१-१६ ने हरवले होते. सिंधूने पहिल्यांदा दुबईत जागतिक सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेत सहभागी होत शानदार सुरुवात केली. भारतीय खेळाडूने हा सामना एक तास ३ मिनिटांत जिंकला.

यामागुचीने पहिला गेम सलग आघाडी घेत २१-१२ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करत सलग १३ गुण घेत २१-८ ने बाजी मारली. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने आपली लय कायम राखत ८-४, १०-६, १६-१०, १९-१२ ने आपली आघाडी मजबूत करत २१-१५ ने गेम आणि सामना जिंकला.

चीनी खेळाडूकडून कॅरोलिना मरिन पराभूत
चीनच्या की सुन यू हिने ब गटात रिओ ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिन मरिनला ५८ मिनिटांत २१-१८, २५-२२ ने पराभूत केले. अ गटात अव्वल मानांकित चिनी तैपेईच्या तेई जू यिंग हिने चीनच्याच बिंग जियाओ हिला ३१ मिनिटांत २१-१६, २१-१३ ने मात दिली.
बातम्या आणखी आहेत...