आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू पुन्हा अॅक्शनमध्ये, चीनच्या बिंगजियाओवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओंडेसे (डेन्मार्क) - रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू देशात सन्मान सोहळ्यात व्यग्र असल्याने सरावापासून दूर होती. मात्र, अाता पुन्हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर परतली आहे. तिने सात लाख डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
स्पर्धेत सहावी मानांकित सिंधूने चीनच्या बिंगजियाओला सरळ गेममध्ये २१-१४, २१-१९ ने पराभूत करताना ३३ मिनिटांत सामना जिंकला. दुसऱ्या फेरीत आता सिंधूचा सामना १२ वी मानांकित जपानच्या सायका सातोशी होईल. या दोन्ही खेळाडूंचा हा पहिलाच सामना असेल. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर सिंधूची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सिंधूचा बिंगजियाओविरुद्ध हा चौथा सामना होता. ११ वी मानांकित चिनी खेळाडूने यापूर्वी तीन वेळा सिंधूविरुद्ध विजय मिळवला होता. सिंधूने याआधी मलेशियन ओपनमध्ये तिला हरवले होते. आता सिंधू आणि बिंगजियाओमध्ये ३-२ असा करिअर रेकॉर्ड झाला आहे.

जगातील आठव्या क्रमांकाची खेळाडू सिंधूने आक्रमक खेळ करताना पहिला गेम ३-३ ने बरोबरीत केला. यानंतर चार गुण घेत १०-५ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येसुद्धा दोन्ही खेळाडू १९-१९ अशा बरोबरीत आल्या. मात्र, सिंधूने हा सामना २१-१९ ने जिंकला.
बातम्या आणखी आहेत...