आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता कबड्डी वर्ल्डकपमध्ये पाकच्या सहभागावर बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शुक्रवारपासून भारतात कबड्डी वर्ल्डकप सुरू होत आहे. या स्पर्धेत अव्वल १२ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत पाकिस्तानला सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर असलेला तणाव बघून आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने हा निर्णय घेतला.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना आमच्यासोबत पक्षपात झाल्याचा आरोप केला आहे. दोन्ही देशांतील तणाव बघून हा निर्णय घेण्यात आला असेल तर मग दोन्ही देशांना स्पर्धेबाहेर करायला हवे होते, असे पाकिस्ताने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...