आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२०: पाकिस्तानची श्रीलंकेवर एका विकेटने मात; श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका २-० ने जिंकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह जल्लोष करताना पाकिस्तान संघाचे खेळाडू. - Divya Marathi
मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफीसह जल्लोष करताना पाकिस्तान संघाचे खेळाडू.
कोलंबो- अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात अन्वर अलीच्या तडाखेबंदी फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने टी-२० सामन्यात श्रीलंकेवर एका विकेटने निसटती मात केली. श्रीलंकेने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा काढून शानदार विजय मिळवला. या विजयासह दोन सामन्यांची मालिका पाकने २-० ने आपल्या नावे केली. त्यामुळे लंकेला ही मालिका गमावावी लागली.

आफ्रिदी, अन्वर तळपले
विजयासाठी १७३ धावांचा पाठलाग करताना पाकची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर १६ धावांच्या आत तंबूत परतले. मुख्तार अहेमद ४, तर अहेमद शहेजाद ७ धावा काढून बाद झाले. मोहंमद हाफिजने ११, तर शोएब मलिक ४ धावा काढून परतला. युवा फलंदाज उमर अकमलने ४ धावांचे योगदान दिले. पाकची टीम ५ बाद ४० धावा अशी संकटात सापडली. यानंतर रिजवान (१७), कर्णधार आफ्रिदी (४५), वसीम (२४) व अन्वर अली (४६) यांनी पाकचा विजय खेचून आणला. रिजवानने १८ चेंडूंत १७ धावा, आफ्रिदीने २२ चेंडूंत ४५ धावा ठोकल्या.

शेहन जयसूर्या, कापुगेदराची चमक
श्रीलंकेकडून युवा फलंदाज शेहन जयसूर्या (४०) व चामरा कापुगेदरा (४८) यांच्या खेळीच्या बळावरच लंकेने ७ बाद १७२ धावांचा स्कोअर उभा केला. इतर फलंदाजांनी निराशा केली. कुशल परेराने १९, दिलशानने १०, डिसिल्वाने १४ धावांचे योगदान दिले. सिरिवर्दनाने २३ धावा जोडल्या. शेहन जयसूर्याने ३२ चेंडूंत ४० धावा ठोकल्या, तर आठव्या क्रमांकावर आलेल्या कापुगेदराने २५ चेंडूंत ४ षटकार, २ चौकारांसह नाबाद ४८ धावांचा पाऊस पाडला.
बातम्या आणखी आहेत...