आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Pakistani British Boxer Amir Khan In Latest Controversy, Woman Claims He Tried To Seduce Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर खान मला दररोज अश्लील व्हिडिओ पाठवण्यास सांगायचा, महिलेचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - गेली 3 महिने पत्नी फरयालपासून दूर राहिलेला पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश बॉक्सर आमिर खान सर्व वाद विसरून पत्नीकडे परतला. पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचे ऐकल्यांतर त्याने पुन्हा तिच्यासोबत संसार थाटला. नुकतेच एक ट्वीट करून आपण चांगला पती आणि आदर्श वडील बनणार असे त्याने सांगितले. मात्र, ब्रिटनच्याच एका महिलेने तो सुधरलाच नसल्याचा दावा केला आहे. एक्स मॉडेल एमा बॉन्डचा दावा आहे, की आमिर खान तिला अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भीक मागत होता.

 

आणखी काय म्हणाली एमा? 
> ब्रिटिश दैनिक 'द सन'च्या वृत्तानुसार एमाने सांगितल्याप्रमाणे, बॉक्सर आमिर खानने तिला सर्वप्रथम इंस्टाग्राम अकाउंटवर तिला एक मेसेज केला होता. यानंतर फ्लर्ट करून व्हॉट्सअॅप नंबर घेतले. मग, या दोघांनी चॅटिंग सुरू केली. 
> आमिर खान फरयालपासून ऑगस्टमध्ये दूर झाला. त्याचवेळी त्याने एमाशी चॅटिंग सुरू केली. मेसेजेस करत असताना तो अश्लील भाषा वापरत होता. चॅटिंगच्या एका महिन्यातच त्याने एमाला आपल्या घरी भेटायला बोलावले. यानंतर दररोज तिला अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. 
> वारंवार घरी बोलावूनही एमा गेली नाही. यानंतर आमिर खान अक्षरशः अश्लील फोटो, व्हिडिओ आणि भेटीसाठी भीक मागत होता. त्याने थेट शारीरिक संबंधांची मागणी केली. ऑक्टोबरमध्ये त्याने एमाला आपल्या पत्नीलो सोडल्याचे सांगितले आणि परत भेटण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. 

 

कोण आहे एमा?

> एमा एक सिंगल आई आहे. एक ऑलिम्पिकपटू आपल्याशी संबंध जोडण्यास पुढाकार घेत असल्याचे तिला वाटत होते. अखेर नोव्हेंबर महिन्यात एमाने आमिर खानला भेटण्यास होकार दिला. पण, एमाला भेटण्यापूर्वीच आमिर खानने ट्विटरवर फोटो पोस्ट करून आपल्या पत्नीकडे परतल्याचे जाहीर केले. त्याची पत्नी 4 महिन्यांची गर्भवती आहे. 

 

कोण आहे आमिर खान?

> दोनदा युनिफाइड WBA वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन आणि एकदा IBF टायटल मिळवणारा आमिर खान एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. तो सध्या एका रियालिटी शोच्या माध्यमातून टीव्हीवर पदार्पण करत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आमिर खान, फरयाल आणि एक्स मॉडेल एमाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...