आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षपात, संकटावर मात करत बनल्या चॅम्पियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - ट्विंकल सोहेल आणि सोनिया अजमत या पाकिस्तानच्या १९ वर्षीय दोन ख्रिश्चन पॉवरलिफ्टर आहेत. दोघींनी पहिल्यांदा ज्युनियर एशियन बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेताना सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पाकिस्तानकडून सुवर्णपदक जिंकणारी िट्वंकल देशाची पहिली खेळाडू बनली. आता दोन्ही खेळाडू १४ ऑक्टोबरपासून ताश्कंद येथे होणाऱ्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सहभागी होतील. यानंतर डिसेंबरमध्ये न्यूझीलंड येथे होणाऱ्या आशिया-ओसनिया पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतील.

दोघी पाकिस्तानच्या अल्पसंख्याक समूहातील आहेत. याचा परिणाम त्यांच्या खेळावरही झाला. िट्वंकल तर मार्च महिन्यात ईस्टरवर झालेल्या हल्ल्यात बालंबाल बचावली होती. जेथे हल्ला झाला त्या लाहोर पार्कजवळच ती होती. तालिबानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात ७२ ख्रिश्चन लोकांचा मृत्यू झाला. दोघींना ख्रिश्चन असल्यामुळे पक्षपात सहन करावा लागला. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक लोकांना नाेकरी मिळत नाही. सोनियाचे वडील त्यांना सोडून गेले होते. यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचे संगोपन केले. ती एका फॅक्ट्रीत काम करते. तेथेच िट्वंकलचे वडील स्वच्छता कामगार होते. त्यांचे घर लाहोरच्या झोपडपट्टीत होते. येथे ट्रेनिंगची चांगली सुविधा नाही. या दोघींसोबत शाळेसह ट्रेनिंग आणि निवड चाचणीतही सर्रास पक्षपात व्हायचा. दोघींना आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक मेहनत करावी लागत असे. या दोघींनी या प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला आणि ज्युनियर नॅशनल संघात स्थान मिळवले. िट्वंकल ५७ किलो, तर अजमतने ६३ किलो गटात सुवर्ण जिंकून स्वत:ला सिद्ध केले.

सोनिया आणि िट्वंकल आशियाई सुवर्णपदक विजेता रशीद मलिककडून ट्रेनिंग घेतात. मलिक म्हणाले, ‘दोघींना आपल्या सहकारी खेळाडूंच्या तुलनेत अधिक मेहनत घ्यावी लागते. अापल्याकडे प्रतिभा असेल तर कोणालाही मागे टाकू शकतो, हे या दोघींनी सिद्ध केले.’
बातम्या आणखी आहेत...