आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन पॅसिफिक टेनिस: सानिया-बार्बाेराला अजिंक्यपदाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाेकियाे - महिला दुहेरीतील जगातील नंबर वन टेनिस स्टार सानिया मिर्झाने अापली नवीन सहकारी बार्बाेरा स्ट्रायकाेवासाेबत सत्रातील पहिला किताब जिंकण्याच्या अाशा पल्लवित केल्या अाहेत. दुसऱ्या मानांकित जाेडीने शुक्रवारी पॅन पॅसिफिक अाेपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. सानिया अाणि बार्बाेराने महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात कॅनडाच्या गाब्रिएला दाब्रावास्की अाणि स्पेनच्या मारिया जाेस मार्टिना सांजेझला पराभूत केले. या जाेडीने ४-६, ६-३, १०-५ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह दुसऱ्या मानांकित जाेडीने स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला.

सानिया मिर्झा ही प्रथमच बार्बाेरासाेबत महिला दुहेरीत नशीब अाजमावत अाहे. गत महिन्यातच तिने स्वीसच्या मार्टिना हिंगीसला साेडचिठ्ठी दिली. त्यानंतर तिने महिला दुहेरीसाठी चेक गणराज्यच्या बार्बाेराची निवड केली. यासह अाता ही जाेडी प्रथमच अांतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली. मात्र, सानियासाेबत याेग्य प्रकारचा समन्वय साधत बार्बाेराने स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यातील विजयात माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे सानियाला अाता अापली किताब जिंकण्याची लय सत्रातही अबाधित ठेवता येईल.

दुसऱ्या मानांकित सानिया अाणि बार्बाेराची निराशाजनक सुरुवात झाली. सुमार खेळीमुळे त्यांना पहिला सेट गमवावा लागला. मात्र, पिछाडीवर पडलेल्या सानिया अाणि बार्बाेराने दमदार पुनरागमन करताना दुसरा अाणि तिसरा सेट जिंकून सामना अापल्या नावे केले. त्यामुळे त्यांना उपांत्य सामन्यात बाजी मारता अाली. अाता या जाेडीला अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवण्याचा विश्वास अाहे.
बातम्या आणखी आहेत...