आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकज अडवाणी चॅम्पियन , वर्ल्ड बिलियर्ड्स स्पर्धेेचे 11 व्यांदा जिंकले अजिंक्यपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू : भारताचा पंकज अडवाणी आयबीएसएफच्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने सोमवारी फायनलमध्ये दिग्गज खेळाडू पीटर गिलख्रिस्टवर मात केली. त्याने ११ व्यांदा या किताबाचा बहुमान पटकावला. त्याने ५-३ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. यासह त्याला किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले.

सकाळच्या सत्रामध्ये भारताच्या पंकज अडवाणीने सेमीफायनलमध्ये अांग हतायचा ५-० ने पराभव केला. यासह त्याने अंतिम फेरीत धडक मारली. गिलख्रिस्टने उपांत्य लढतीत भारताच्या ध्वजला ५-१ ने पराभूत केले. मात्र, पंकजने आता फायनलमध्ये ध्वज हरियाच्या पराभवाची परतफेड पीटर गिलख्रिस्टला केली.
बातम्या आणखी आहेत...